Top News

डॉक्टर सोनोणे दाम्पत्याकडून लघु व्यावसायिकांना गोल्फ छत्र्या वाटप

डॉक्टर सोनोणे दाम्पत्याकडून लघु व्यावसायिकांना गोल्फ छत्र्या वाटप 


 तेल्हारा (ता. प्र. मनोज भगत) ::  सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणारे अकोला येथील डॉक्टर राजेंद्र सोनोने व त्यांच्या पत्नी डॉक्टर अंजली सोनोणे नेहमी नवनवीन समाजकार्य करीत असतात. कधी शाळेला वाटर कुलर , कधी रक्तदान शिबिरे , शाळेत शालोपयोगी साहित्याचे वाटप , तर कधी डिजिटल शाळा असे नवनवीन सामाजिक उपक्रम ते राबवित असतात. त्यातच यावर्षी डॉक्टर सोनोणे दांपत्याने एव्हरेस्टवर चढाई करून अकोला जिल्ह्या च्या शिरपेचात एक नवीन पराक्रमाची नोंद केली आहे. डॉक्टर राजेंद्र सोनोणे सरांनी अकोला शहरात बधीरीकरण तज्ञ म्हणून सुरुवात केली त्याला या एप्रिल महिन्यात 31 वर्ष पूर्ण झाली. डॉक्टर अंजली सोनोणे यांनी प्रॅक्टिस सुरू करून याच एप्रिल महिन्यात 29 वर्ष पूर्ण झालीत. डॉक्टर राजेंद्र सोनोणे व डॉक्टर अंजली सोनोणे या दांपत्याने स्वतःचे हॉस्पिटल सुरू करून रुग्ण सेवेला याच एप्रिल महिन्यात 21 वर्ष पूर्ण झालीत,या वर्धापनदिनानिमित्त रस्त्याच्या कडेला बसून उ्न्हापावसात लघु व्यवसाय करणाऱ्या  १० विक्रेत्यां ना ५४ इंची मोठ्या, ऑटो ओपन, गोल्फ छत्र्या उन्हापावसा पासून त्यांचं संरक्षण व्हावं ह्या उद्देशाने सप्रेम भेट दिल्या. ह्या छ्त्र्यांना रिफ्लेक्टीव्ह स्ट्राइप आणि कव्हर असून त्या विंडप्रूफ, यूव्ही प्रोटेक्शनसह वॉटरप्रूफ अश्या आहेत. यात जीवन कांबळे,भोला खेडकर,राजु सागर,सुरेश बरेलीकर,चंद्रभान लाखोंचे,गौरव गव‌ई,धनु आमले,कमलबाई,मेंढेलाल खेडकर,तिलक खेडकर या सर्व रस्त्याच्या कडेला भाजीपाला विकणाऱ्या, चपला जोडे दुरूस्त करणाऱ्या छोट्या विक्रेत्यांच प्रथम पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून डॉक्टर राजेंद्र सोनवणे व डॉक्टर अंजली सोनवणे यांनी  प्रत्येकाला १ छत्री प्रदान केली.

अश्या प्रकारचे विविध समाजो पयोगी उपक्रम दरवर्षी हे राबवत असतात. डॉक्टर राजेंद्र सोनोणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की मी एम बी बी एस च्या दुसऱ्या वर्षापासून  नियमित रक्तदाता आहे आणि माझ्यासाठी हा एक उत्सव साजरा करण्याचा एक मार्ग आहे.  आयएमए अकोला आणि हेगडेवार रक्तपेढी, भारत विकास मंच आणि राष्ट्रीय विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने  आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते होणार आहे.43 व्यांदा रक्तदान करून मी शिबिराचे उद्घाटन केले ज्यामध्ये एकूण १६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले असे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले. डॉक्टर सोनोणे दाम्पत्यांनी केलेल्या या समाजकार्याचे सर्वत्र कौतुक होत असून यापासून प्रेरणा घेऊन अनेक रक्तदाते समोर येऊन गरजवंतांना साथ देतील अशी आशा आहे.

Previous Post Next Post