Top News

S. to the families of the accident victims. T. G. Life Sciences Company contributed Rs. 14 lakhs

अपघातग्रस्त कुटुंबीयांना एस. टी. जी. लाईफ सायन्सेस कंपनीने केली १४ लाख रुपयांची मदत



विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर | मनोज श्रीहरी गोरे| उपजिल्हा प्रतिनिधी 

 एस टी जी लाईफ सायन्सेस या खाजगी वैद्यकीय कंपनीत दोन महिने काम केले.सर्व काही सुरळीत सुरू असतांनाच कर्तव्यावरून घराकडे जात असताना १३ डिसेंबर २०२३ ला यवतमाळ शहराजवळ असलेल्या उड्डाणपुलावर विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या कारने किन्ही येथील नरेंद्र तुरी यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.यात त्यांचा मृत्यू झाला होता.कुटुंबाचा आधार असलेला कर्ता माणूस नरेंद्र तुरी यांचे अपघाती निधन झाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.त्यामुळे त्यांचे कुटुंब आर्थिक विवंचनेत सापडले.आपणही समाजाचे काही देणे लागतो या उदात्त भावनेतून नरेंद्र तुरी यांनी केवळ दोन महिने कंपनीत सेवा दिल्यानंतरही एस टी जी लाईफ सायन्सेस या कंपनीने त्यांच्या कुटुंबियांना १४,४१,०५० रुपयांचा धनादेश देऊन आर्थिक मदत केली.यावेळी एस टी जी लाईफ सायन्सेस या कंपनीचे व्यवस्थापक श्रीनाथ वर्णा व मंगेश जोशी यांचेसोबत तुरी यांची पत्नी आणि कुटुंबीय उपस्थित होते.अपघातग्रस्त परिवाराला आर्थिक सहाय्य केल्याने तुरी कुटूंबीयांनी कंपनी व्यवस्थापकांचे मनापासून आभार मानले आहे.

Previous Post Next Post