Top News

लोकसभा निवडणुकाची तारीख जाहीर....ऐकुन ७ टप्यात होणार निवडणूक ।

लोकसभा निवडणुका जाहीर


 आचारसंहितेमधील महत्त्वाचे 10 नियम कोणते?

ऐकुन ७ टप्यात होणार निवडणूक ।


विदर्भ माझा न्युज 24 - दिल्ली

देशातील लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत. यासोबतच काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही जाहीर होणार आहेत. लोकसभा आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक आयोगाने आज (शनिवार) दुपारी ३ वाजता पत्रकार परिषदेत सांगिलते. सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून रोजी संपत असून त्यापूर्वी नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कूमार यांनी ही घोषणा केली आहे.

लोकसभेच्या निवडणुकांना १९ (शुक्रवार) एप्रील २०२४ पासून सुरुवात होणार आहे. तर ४ जूनला निकाल लागणार आहे. दिड कोटी कर्मचारी निवडणूक पार पाडतील. देशात ९७ कोटीहून अधिक मतदार आहेत. तर साडे दहा लाखांहून अधिक मतदान केंद्र आहेत. ७ टप्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत.

पहील्या टप्प्यातील निवडणूक १९ एप्रीला होणार आहे. .

दुसरा टप्पा - ४ (गुरुवार) एप्रिल पासून अर्ज भरता येणार तर २६ (शुक्रवार) एप्रिल २०२४ ला मतदान होणार आहे.

तिसरा टप्पा - ७ (मंगळवार) मे ला मतदान होणार आहे. तर १२ राज्यांमध्ये निवडणुका होणार


चौथा टप्पा - १३ (सोमवार) मे ला मतदान


पाचवा टप्पा - २० (सोमवार) मे ला मतदान


सहावा टप्पा - २५ (शनिवार) मे ला मतदान


सातवा टप्पा - १ (शनिवार) जून ला मतदान


महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान होणार आहे. तर २० मे (सोमवार) रोजी मतदान होणार आहे.


पहिला टप्पा - शुक्रवार, दि. 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर


दुसरा टप्पा - शुक्रवार, दि. 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी


तिसरा टप्पा - मंगळवार, दि. 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले


चौथा टप्पा - सोमवार, दि. 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड


पाचवा टप्पा- सोमवार, दि. 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ


आयोजित पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं की, १६ जून २०२४ रोजी लोकसभेचा कार्यकाळ संपत आहे. शिवाय देशात काही राज्यांमध्ये याच काळामध्ये विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. तिथेही निवडणुका होणार आहेत.

१०.५ लाख पोलिंग बूथ असून ९७ कोटींपेक्षा जास्त मतदार आहे. देशातील भौगोलिक परिस्थिती निराळी आहे. तरीही विनासायास निवडणुका पार पाडण्याचा आयोगाचा अनुभव आहे. ५४ लाखांपेक्षा जास्त ईव्हीएम मशिन्सद्वारे लोकसभा निवडणुका संपन्न होणार असून दीड कोटी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत, असं मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितलं.


रणसंग्राम सुरु झाला आहे. एकूण 7 टप्प्यात निवडणुका होणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज निवडणुकांची घोषणा केली. या निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांना देशातील निवडणुकांची सविस्तर माहिती सांगितली. दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत एका उमेदवाराला किती खर्च करता येणार आहे? आचारसंहितेमध्ये कोणत्या गोष्टीचं पालन करावं लागेल? पाहुयात आचारसंहितेमधील महत्त्वाचे 10 नियम. 


निवडणूक आयोगाच्या आजच्या घोषणेनंतर संपूर्ण देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे. देशभरात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घालून दिले आहेत. आयोगाच्या याच नियमांना आचार संहिता असे म्हटले जाते. लोकसभा अथवा विधानसबा निवडणुकांदरम्यान या नियमांचे पालन करणे हे सरकार, नेतेमंडळी आणि राजकीय पक्षांसाठी बंधनकारक असते.

आचारसंहितेमधील महत्त्वाचे 10 नियम कोणते?


निवडणुकीत वैयक्तिक पातळीवर टीका नको


धार्मिक द्वेषपूर्ण विधाने केली जाऊ नयेत


कोणत्याही उमेदवाराला मतदारांना धमकावता येणार नाही


प्रचारसभा, रॅली किंवा मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची पूर्वपरवानगी गरजेची


नियमांच्या चौकटीत राहूनच काम करावं लागेल


उमेदवाराला धर्म, जात, पंथ याआधारे मतदान मागता येणार नाही


तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करता येणार नाही


निवडणुकांमध्ये कोणत्याही प्रकारची हिंसा होणार नाही याची काळजी घ्या


प्रचारात लहान मुलांचा वापर झाला तर आम्ही कडक कारवाई करू


अफवा, फेक न्युज पसरवणे खपवून घेतले जाणार नाही.


 


Previous Post Next Post