जय विदर्भ पार्टी लोकसभेच्या नागपूर सह विदर्भात 10 जागा लढविणार....
विदर्भ माझा न्युज 24 - नागपूर
स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीसाठी आणि विदर्भातील शेतकरी, कामगार, शेतमजूर, अल्पसंख्यांक, ओबीसी यांच्या न्यायासाठी, विदर्भातील तरूणांना प्राधान्य देउन कायमस्वरूपी नोकऱ्या प्रदान करण्यासाठी जय विदर्भ पार्टी नागपूर सह विदर्भाच्या १० लोकसभेच्या जागा लढविणार आहे. पक्षाकडे विविध निर्वाचन क्षेत्रातून अनेक उमेदवारी अर्ज आलेले आहेत. यवतमाळ-वाशीम लोकसभा, चंद्रपूर लोकसभा आणि नागपूर लोकसभा निष्चित होत असून चंद्रपूर लोकसभेसाठी अशोक राठोड यांची घोषणा करण्यांत आली असून नागपूर लोकसभेसाठी प्रा. एड्. रमेष पिसे, प्रा. जावेद पाशा, डॉ. ममता मून, नरेष निमजे यांच्या नावांवर चर्चा चाली असून २३ तारखेला अंतीम उमेदवारांची घोषना करण्यांत येईल. रामटेक लाकसभेसाठी भोजराज सरोदे यांचा अर्ज आलेला आहे.
वेगळ्या विदर्भाच्या नावावर अनेक लोकांनी आंदोलन केलीत. यातून जे नेते निवडून आलेत त्यांनी पुढे विदर्भराज्य निर्मितीसाठी एक शब्द हि उच्चारला नाही किंवा कार्य केले नाही. एका अर्थाने विदर्भद्रोह केला असे म्हणावे लागेल. भाजपा नेते नितीन गडकरी यांनी निवडून येण्यापूर्वी विदर्भाचे वेगळे राज्य निर्माण करण्याचे शपथपत्र दिले होते. देवेंद्र फडणवीस यांनी तर विदर्भाचे वेगळे राज्य होईपर्यंत लग्न करणार नाही अशी ग्वाही दिली होती. कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी विदर्भाचे वेगळे राज्य करण्याची भूलथाप देऊन निवडणूक जिंकली मात्र निवडून आल्यावर विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी पाठ फिरवली. आज सर्वाधिक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा प्रदेश म्हणून विदर्भ देशामध्ये कुप्रसिद्ध आहे. विजेचे भरघोस उत्पादन करणारा विदर्भ मात्र अंधाराने ग्रस्त विदर्भ. विदर्भाच्या शासन प्रशासनात विदर्भाबाहेरील लोकांचा भरणा मात्र विदर्भातील तरुण बेरोजगार अशी भयावह स्थिती केवळ राजकीय आकसापोटी निर्माण करण्यात आल्याचे स्पष्ट चित्र आहे म्हणून विदर्भद्रोही नेत्यांना धडा शिकविण्यासाठी आणि विदर्भ राज्य निर्माण करण्याच्या ठाम भूमिकेसाठी विदर्भाच्या १० ही लोकसभेच्या जागा लढविण्याचा निर्णय जय विदर्भ पार्टी ने घेतलेला आहे आणि या सर्वांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी पूर्ण शक्तीनिशी लढा देणार आहे. जय विदर्भ पार्टी यासाठी समविचारी पक्षांना सामाजिक संघटनांना सोबत घेऊन हि निवडणूक लढणार आहे यासाठी इतर पक्षांकडून योग्य उमेदवार दिल्यास आपसी सहमतीने त्यांच्यासाठी जागा सोडून त्यांच्यासोबत निवडणूक लढवेल. यासाठी विदर्भ माझा, विदर्भ राज्य आघाडी, स्वतंत्र भारत पक्ष, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी, कुणबी बहुजन स्वराज्य पक्ष, जनहित प्रजा पार्टी, रिपब्लिकन सोशलीष्ट पार्टी, खोरिप, भारतीय मुस्लीम परिषद, राष्ट्रीय संयुक्त मोर्चा भारत, महाविदर्भ जनजागरण समिती, शेतकरी संघटना, फुले शाहू आंबेडकरी विचार मंच, जनमंच व इतर संघटना यांनी मिळून विदर्भ निर्माण महामंच स्थापन केला असून या आघाडीवर निवडणूक लढण्यात येणार आहे.
