Top News

Ahead of the Lok Sabha elections in the state, the Congress has a big problem

राज्यात लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठी खींडार


महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव, आदिवासी विभागाचे प्रदेशाध्यक्ष, गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि सलग दोनदा चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे उमेदवार राहिलेले डॉ. नामदेवराव उसेंडी यांचा भाजपात प्रवेश

 


विदर्भ माझा न्युज 24 - नागपूर 

 आत्मनिर्भर भारताचे प्रणेते  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकार्यावर, खंबीर नेतृत्वावर व राज्यातील कणखर नेतृत्व उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री  ना. देवेंद्र फडणवीस आणि भाजपा-महायुतीच्या विकसनशील ध्येय-धोरणांवर प्रभावित होऊन काँग्रेस नेते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव, काँग्रेसच्या आदिवासी विभागाचे प्रदेशाध्यक्ष, गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि सलग दोनदा चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे उमेदवार राहिलेले डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी काल पत्रकार भवन, नागपूर येथे आयोजित भाजपाच्या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा नेते तथा चिमूर विधानसभा क्षेत्राचे  आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया आणि भाजपा नेते तथा माजी आमदार आशिष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. 



राज्यातील काँग्रेसचे मोठमोठे नेते तथा पदाधिकारी यांचे भाजपात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर असतानाच काँग्रेस नेते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव, काँग्रेसच्या आदिवासी विभागाचे प्रदेशाध्यक्ष, गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि सलग दोनदा चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे उमेदवार राहिलेले डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी महायुतीला साथ देत भाजपात पक्षप्रवेश केल्यामुळे राज्यात व मुख्यतः चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्रात काँग्रेसला खिंडार पडली असून आणखी एक मोठा धक्का बसला आहे. 



या पक्षप्रवेशाप्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष  आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत भाजपा नेते तथा चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार  कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया आणि भाजपा नेते तथा माजी आमदार आशिष देशमुख व अन्य मान्यवरांनी काँग्रेस नेते तथा गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांच्या गळ्यात भाजपाचा दुपट्टा टाकून पक्षात सहर्ष स्वागत केले आणि पुष्पगुच्छ भेट देऊन मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

या पक्षप्रवेश व पत्रकार परिषदेप्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत वारजूकर, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, युवा नेते डॉ. विनय उसेंडी, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, भाजपा चिमूर विधानसभा निवडणूक प्रमुख गणेश तर्वेकर, नागभीड कृ.उ.बा. समिती सभापती अवेश पठाण, भाजपा चिमूर तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा नागभीड तालुकाध्यक्ष संतोष रडके, भाजपा नेते रमेश ठाकरे, भाजपा नेते हेमंत लांजेवार व अन्य भाजपा नेते तथा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार बांधव उपस्थित होते.

Previous Post Next Post