Top News

कळमना येथे विविध विकासकामांचे लोकार्पण.

 कळमना येथे विविध विकासकामांचे लोकार्पण. 



विदर्भ माझा न्यूज  24 - चंद्रपूर/राजुरा : मनोज श्रीहरी गोरे, उपजिल्हा प्रतनिधी 

 राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे १५ वा वित्त आयोग व घनकचरा निधी अंतर्गत, आरो प्लांट, सार्वजनिक कचराकुंडी, दिशा दर्शक फलक, अशा विविध विकासकामांचे लोकार्पण कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव, अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते पार पडले. 

           या प्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की एकच ध्यास गावचा सर्वांगीण विकास हे ब्रीद घेऊन कळमना येथे विविध उपक्रम व विकासकामांच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. जनतेला विविध योजनेचा लाभ मिळवून देण्याची माझी भूमिका  आहे. 

        या प्रसंगी उपसरपंच कौशल्या कावळे, ग्रामपंचायत सदस्य दिपक झाडे, साईनाथ पिंपळशेळे, सुनिता उमाटे, रंजना  पिंगे, प्रियंका गेडाम, बाळकृष्ण पिंगे पोलीस पाटील कळमना, निलेश वाढई तंटामुक्ती अध्यक्ष , मरापे ग्रामसेवक, महादेव ताजणे माजी उपसरपंच, भाऊजी पाटील वाढई माजी पोलीस पाटील, दुधे मॅडम मुख्यध्यापक, पेदोर सर, उमरे सर, गोखरे मॅडम, जेष्ठ नागरिक महादेव पाटील पिंगे, आनंदराव पाटील बोढाले, अशोक कावळे सामाजिक कार्यकर्ता, मारोती साळवे, सुरेश गौरकार, मारोती बल्की, विठ्ठल पाटील वाढई, सुरेश कावळे, शंकर गेडाम, शंकर फिसके, शिपाई सुनील मेश्राम, विशाल नागोसे यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post