आवेश पठाण यांची महाराष्ट्र राज्य मजूर सहकार संघ पुणे येथे संचालक पदी अविरोध निवड...
आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी केले अभिनंदन....
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
भारतीय जनता पार्टी चे युवा नेते व कृषी उत्पन्न बाजार समिती नागभीड सभापती आवेश पठाण यांची दि.२९ फेब्रुवारी २०२४ ला महाराष्ट्र राज्य मजूर सहकार संघ,पुणे येथे अविरोध निवड झाली त्याबद्दल चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडिया,विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर, तालुकाध्यक्ष संतोष रडके,माजी बांधकाम सभापती सचिन आकुलवार,भाजपा नेते रमेश ठाकरे,जिल्हा एस.टी.आघाडी सदस्य बंडू गेडाम,जिल्हा सरचिटणीस अल्पसंख्याक आघाडी जहांगीर कुरेशी,जिल्हा सरचिटणीस जिल्हा एस.टी.आघाडी जगदीश सडमाके,जिल्हा सरचिटणीस महिला आघाडी प्रिया लांबट,जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी मंदा कश्यप, महिला आघाडी अध्यक्षा इंदु आंबोरकर,जिल्हा महिला आघाडी सदस्य गिता बोरकर,माजी नगरसेवक संजय अमृतकर,भाजयुमो तालुकाध्यक्ष देवानंद बावनकर,तालुका महामंत्री सुनील शिवणकर,जिल्हा युवा मोर्चा आघाडी उपाध्यक्ष नरेंद्र खोब्रागडे, जिल्हा युवा मोर्चा आघाडी सचिव दिनेश समर्थ या सर्व पदाधिकारी यांनी भारतीय जनता पार्टी तालुका नागभीड च्या वतीने आवेश पठाण यांचे हार्दिक अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आवेश पठान यांची अविरोध निवड झाल्याने आवशे पठान मीत्र परीवार तसेच भाजपा नागभीड यांच्यात जल्लोशाचे वातावरण आहे. तर सर्वच स्तरातून आवेश पठान यांचे अभिनंदन केले जात आहे.
