Top News

हिवरखेड येथे 15 डिसेंबर रोजी भवानी माता मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कळस सोहळा......Bhavani Mata Murti Pran Pratistha and Culmination Ceremony on December 15 at Hiwarkhed....

हिवरखेड येथे 15 डिसेंबर रोजी भवानी माता मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कळस सोहळा....


9 दिवस अखंड हरिनाम महोत्सव तथा श्री देवी भागवत सोहळा....




विदर्भ माझा न्युज 24 - अकोला / हिवरखेड : विषेश प्रतिनिधी मनोज भगत 9970388498


 श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सवाच्या महापर्वावर  हिवरखेड येथील श्री भवानी माता मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह दिनांक 5 डिसेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत संपन्न होत आहे  या सप्ताह कालावधीमध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराचे किर्तने होणार आहेत यामध्ये तिर्थ स्थापना  दिनांक 5 डिसेंबर रोजी सकाळी हभप आत्माराम महाराज वाकोडे यांंचे हस्ते होणार आहे विशेष मार्गदर्शन हभप रमेश महाराज अवारे राहणार असून देवी भागवत दिनांक 5 डिसेंबर ते 12 डिसेंबर पर्यंत हभप राजेन्द्र महाराज वक्टे यांचे अमृत वाणीतून होणार आहे दिनांक 13 डिसेंबर व 14 डिसेंबर ला होम हवन चा कार्यक्रम राहिल 5 डिसेंबर रोजी हभप रमेश महाराज अवारे, 6 डिसेंबर हभप रामभाऊ महाराज उन्हाळे 7 डिसेंबर रोजी हभप शिवेंद्र महाराज काळे, 8 डिसेंबर रोजी हभप रामकृष्ण महाराज अंबुसकर 9 डिसेंबर रोजी हभप शिवाणी महाराज झामरे 10 डिसेंबर रोजी हभप जगदीश महाराज पाटील 11 डिसेंबर रोजी हभप राहुल महाराज कडु   दिनांक. 12 डिसेंबर रोजी हभप श्रीधर महाराज अवारे याचे काल्याचे किर्तन होणार आहे गायनाचार्य श्रीकृष्ण महाराज रावनकार, हभप सोपान महाराज लोखंडे श्रीकांत महाराज कुकडे हभप रामदास महाराज शेळके काम पाहणार आहेत मृदुगाचार्य म्हणून हभप हरिदास महाराज भोयर काम पाहणार आहेत विठ्ठल मंदिर, भवानी मंदिर, शंकर संस्थान दुर्गा माता मंदिर व समस्त गावकरी मंडळी हिवरखेड यांचा सहभाग राहणार आहेत दैनंदिन कार्यक्रम मध्ये काकडा आरती देवी भागवत हरिपाठ किर्तन राहणार आहे नगर प्रदक्षिना व भव्य दिडी सोहळा दिनांक 11 डिसेंबर रोजी 3 वाजता राहील

  दिनांक 15 डिसेंबर शुक्रवार ला देवी ची प्राणप्रतिष्ठा व कळस रोहन सोहळा श्री महंत कृष्णा नंदजी भारती महाराज  वारी हनुमान यांच्या हस्ते संपन्न होणार आहे  त्यानंतर महाप्रसादानंतर या कार्यक्रमाची सांगता होणार आहे भावीक भक्तानी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन भवानी माता मंदीर संस्थान   व गावकरी मंडळी हिवरखेड रूपराव च्या वतीने करण्यात आले आहे .

Previous Post Next Post