Top News

An event that destroys the relationship of friendship! Mitra killed Mitra... How exactly was Sandeep killed? The local crime branch took the accused into custody.

मैत्री या नात्याला काळीमा फासणारी घटना! 


मीत्रानेच केली मीत्राची हत्या....


नेमकी कशी झाली संदीप ची हत्या? स्थानीक गुन्हे शाखेने आरोपीला घेतले ताब्यात.....



विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा

 राजुरा तालुक्यातील रामपुर येथील रहीवाशी 28 वर्षीय संदीप निमकर  9 ऑक्टोबर पासून बेपत्ता होता सदर  युवकाचा मृतदेह 10 ऑक्टोबरला माथरा रोड जवळील झुडपी जंगलात आढळल्याने परीसरात खळबळ उडाली, संदीप निमकर च्या डोक्यावर दगडाने वार केल्याच्या खुणा होत्या, घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक योगेश पारधी व स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार हे घटनास्थळी दाखल झाले होते.


राजुरा पोलिसांनी हत्या प्रकरणी तिघांना ताब्यात घेत विचारपूस सुरू केली होती, मात्र स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांनी आपल्या चाणाक्ष बुद्धीचा वापर करीत  हत्या प्रकरणातील सर्व बाबीचा तपास करीत आरोपीला अवघ्या 2 तासात अटक केली.


नेमकी कशी झाली संदीपची हत्या?

9 ऑक्टोबर ला संदीप व आरोपी हे दोघे माथरा रोडवरील जंगलात दारू पिण्यासाठी गेले होते, दारू पीत असताना दोघांचा वाद झाला आणि आरोपीने जवळील दगड हातात घेत संदीपच्या डोक्यावर जोरात वार केले, हा वार इतका जोरदार होता की यात संदीप चा जागीच मृत्यू झाला, आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. विशेष म्हणजे आरोपी व मृतक संदीप हे दोघे घनिष्ठ मित्र होते.

Previous Post Next Post