स्वच्छता अभियान सातत्याने सुरु ठेवा :- हभप विठ्ठलराव डाखरे महाराज
विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना
श्री गुरुदेव सेवक, युवा मित्र, ज्येष्ठ नागरिक , सेवानिवृत्त कर्मचारी पुरूष व महीला यांच्या वतीने शिवाजी चौक बस स्टॉप येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले. सर्व प्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उत्तमराव मोहितकर, कीर्तनकार विठ्ठल महाराज डाखरे, हभप मीनाथ महाराज पेटकर, संयोजक सेवानिवृत्त प्राचार्य संजय ठावरी, जिल्हा बँकेचे माजी व्यवस्थापक अनिल रेगुंडवार , सेवानिवृत्त शिक्षक संजीव चांदुरकर , शांताराम देरकर, सत्यवान घोटेकर , दिलीप जेनेकर, झाडे काका, वैरागडे काका, ऊईके, माजी मुख्याध्यापक विजय मसे, परचाके, पतीराम आवारी, गेडाम, सिडाम, आनंद पानघाटे, जगदीश पेटकर, रहीम , खोबरकर बंधू, सुधा मोहितकर, हर्षल उरकुडे, अंकुश कलसकर, मेघराज हरबड़े, बोबडे यांनी बस स्टॉप चौकाची चोहोबाजुनी स्वच्छता केली प्रसंगि सेवानीवृत प्राध्यापिका ज्योति रेगुंडवार व नागोसे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला, उपसस्थितानी शुभेच्या दिल्या. डाखरे महाराज यांनी मार्गदर्शन केले संचालन माजी नगरसेवक प्रशांत लोडे तर आभार उमेश पालीवाल यांनी मानले.

