अपघातग्रस्त वाहनचालक अनंता रामटेके यांना वाहनचालक संघटनेकडून ₹ ५०००/- रुपये प्रती महिना मदत...स्तुत्य उपक्रमांचे सर्वत्र कौतुक....
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
वाहन चालकांचे हित जपण्याचा उदात्त हेतू ठेवून कार्यरत असलेली अनैशा वाहन चालक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या संघटनेचे सभासद वाहनचालक अनंता रामटेके यांचे मोटारसायकल अपघातात दोन जागी मोडलेल्या उजव्या पायाचे गांभीर्य लक्षात घेऊन जखम दुरूस्त होऊन चालते फिरते होई पर्यंत वाहनचालक संघटनेच्या वतीने रूपये पाच हजार रुपये महिना सुरू करण्यात आला आहे.
अनंता रामटेके हे अम्बुजा सिमेंट उपरवाही येथील डीएनआर ट्रान्सपोर्ट कम्पनीत ट्रकवर वाहनचालक या पदावर कार्यरत आहे. दिनांक २४ सप्टेंबर २०२३ ला सकाळी ११ वाजताच्या सुमारास रामटेके यांनी आपल्या कामाचा निपटारा करून ड्युटी संपवून आपला ट्रक अम्बुजा सिमेंट येथील पार्किंगला उभा केला आणि आपल्या घरी चंद्रपूर येथे जावयास निघाला. राजुरा- गडचांदूर महामार्गावर मालपाणी सेलिब्रेशन सभागृहा जवळील अभिनंदन बार एन्ड रेस्टॉरंट जवळ रामटेके यांच्या मोटारसायकलला हरदोना बुद्रुक येथील आमने यांच्या मोटारसायकलने मागून धडक दिली.
या धडकेत दुचाकीस्वार रामटेके यांच्या उजव्या पायांवर दुचाकी पडल्याने पाय दोन जागी तुटला. आपल्या सहकारी वाहनचालक रामटेके यांचा अपघात झाला ही बाब वाहनचालक संघटनेचे अध्यक्ष सुरज उपरे यांच्या सहकाऱ्यांना माहिती झाल्याबरोबर त्यांनी तातडीने ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर येथे भरती केले. परंतु परिस्थिती चिंताजनक असल्याचे लक्षात येताच येथील डॉक्टरांनी चंद्रपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला. चंद्रपूर येथील डॉ. बुक्कावार यांच्या दवाखान्यात त्यांना भरती करण्यात येऊन त्यांच्या उजव्या पायाची शस्त्रक्रिया करून दोन जागी पाय जोडण्यात व पायात रॉड टाकण्यात आला असून डॉक्टरांनी यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
अनंता रामटेके यांचा अपघात झाला तेव्हा पासून अनैशा वाहन चालक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्ष सुरज उपरे आणि यांच्या वाहनचालक सहकाऱ्यांनी रामटेके यांना दवाखाना, पोलिस ठाण्या संदर्भात आणि अन्य घरातील सदस्य समजून सर्वोतोपरी मदत केली. तसेच दिनांक ८ ऑक्टोबर २०२३ ला अध्यक्ष यांनी स्वतः पुढाकार घेऊन आपले सहकारी गडचांदूर अध्यक्ष सत्यपाल भिमा गौरकार, उमाकांत शामराव वाघमारे व रिपब्लिकन चळवळीचे प्रचारक अशोककुमार उमरे यांच्या समवेत चंद्रपूर येथील अनंता रामटेके यांच्या घरी जाऊन त्यांची आई आणि पत्नी सपना अनंता रामटेके यांच्या उपस्थितीत रोख रक्कम पांच हजार रुपये दिले आणि दुरूस्त होईपर्यंत दर महिना पांच हजार रुपये महिना देण्याची ग्वाही देण्यात आली.
अनंता रामटेके आणि यांच्या कुटुंबीयांवर अपघातामुळे पडलेल्या दुःखाच्या पळता काळात अनैशा वाहन चालक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेची ही छोटीशी मदत नक्कीच फलदायी आशेची किरण देणारी आहे. सुरज उपरे आणि यांच्या सहकाऱ्यांच्या या स्तुत्य उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


