Top News

Bhumipujan assembly election chief Devrao Bhongle completed development works worth 25 lakh rupees in Rajura taluka.

राजुरा तालुक्यात २५ लक्ष रूपयांच्या विकासकामांचे भुमिपुजन विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांच्या शुभहस्ते संपन्न।




विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा


आज राजुरा तालुक्यातील मौजा भुरकुंडा (खुर्द) येथे जनसुविधा निधी अंतर्गत मंजुर झालेल्या २५ लक्ष रूपयांच्या विकासकामांचे भुमिपुजन विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. 

या विकासकामांमध्ये भुरकुंड्यात ०५ लक्ष किंमतीचा सिमेंट काँक्रीट रस्ता तसेच १० लक्ष किंमतीचा स्मशानभूमीकडे जाणारा सिमेंट काँक्रीट रस्ता आणि सुकडपल्ली येथे १० लक्ष किंमतीचा सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम करणे यांचा समावेश आहे. 

याप्रसंगी माजी आमदार सुदर्शन निमकर, तालुकाध्यक्ष सुनिल उरकुडे, माजी प. स. सदस्या सुनंदा डोंगे, विनोद नरेन्दुलवार, सरपंचा बहिनाबाई आत्राम, उपसरपंच अजय राठोड, अमृत आत्राम, दिलीप गिरसावळे, प्रदिप बोबडे, नामदेव कुमरे, सुनिता लोहट, सविता रेगुंडवार कविता कुमरे, संतोष मरस्कोल्हे, मंजुषा चहाकाटे, लक्ष्मन नेहारे, पर्वतराव आत्राम, पोचन्ना अप्पलवार, भिमराव आत्राम, गटन्ना पाकावार, तिरूपती अप्पलवार, रोहन अप्पलवार आदिंसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Previous Post Next Post