Top News

Fatal accident involving truck and bus Read the names of the injured in the accident....👇🏻👇🏻👇🏻

ट्रक आणी बसचा भीषण अपघात...

वाचा अपघातात जखमींची नावे....👇🏻👇🏻👇🏻



 विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड 

जिल्ह्यातील नागभिड जवळ आज सकाळी ८:०० ते ८.३० वाजताच्या दरम्यान ट्रक आणि बस यांची समोरा समोर  धडक झाल्याने‌ ट्रक चालक गंभीर जखमी तर‌ बस मधील चालक व वाहका सह ११ प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघात एवढा भिषण होता की बस आणि ट्रकचा समोरील भाग चेंदामेंदा होऊन ट्रक ड्रायव्हर ट्रक मध्ये एक तास अडकुण राहिला. घटनेची माहीती मीळताच घटना‌स्थळी पोलिस दाखल‌होऊन   क्रेनच्या सहायाने ट्रक चालकाला बाहेर काढले. चालक गंभीर जखमी असल्याने त्याला नागपूर येथील रूग्नालयात उपचारार्थ हलविण्यात आले.


ब्रह्मपुरी आगारची ब्रह्मपुरी ते अमरावती बस क्रमांक Mh 13 CU 8337 ही बस सकाळी सात वाजता ब्रम्हपूरी वरून सुटली त्यामध्ये वाहक म्हणून  सौ. रीना प्रकाश मेश्राम व बस चालक अविनाश रमेशराव उंबरकर हे होते. नागभीड समोर एक किलोमीटर अंतरावर नवखडा गावा जवळ नागपूरवरून वडसा कडे गॅरेजचा माल घेवून ट्रक येत होता तर बस ब्रम्हपूरी वरून नागपूर कडे जात होती. ट्रक ड्रायव्हर ने बस च्या दिशेने आणून बसला धडक दिली यामध्ये बस चालक, बसवाहक, ट्रक चालका सह प्रवासी जखमी झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे दाखल करण्यात आले तर ट्रक चालकाचे दोन्हीही पाय निकामी झाल्याने त्याला नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

अपघाता मुळे नागपूर - नागभीड महामार्ग एक ते दिड तास बंद होता. मात्र नागभीड येथील वाहतुक यंत्रनेने युक्ती लढवीत रहदारीस अळथळा निर्माण होऊ नये या करीता शक्य असलेल्या अनेक लहान मोठ्या वाहनांना नवखळा,डोंगर गाव, मार्गाने वळवील्याने महामार्गावर वाहतुकीची गर्दी निर्माण झाली नाही. 

अपघातात जखमींची नावे खालील प्रमाणे.....

१) अविनाश रमेश उंबरकर वय ४० वर्ष बस चालक

२) सौ. रीना प्रकाश मेश्राम वय ३८ वर्ष बस वाहक

३) मारोती प्रभाकर कापगते वय ४९ वर्ष, रा . नवेगाव बांध

४) मुकेश सुधाकर निकोसे वय २८ वर्ष रा. वाढोना, ता. उमरेड जिल्हा नागपूर

५) स्नेहा गोविंदा वरटे वय २० वर्ष रा. खैरी ता. चिमूर

६) विलास मारोती विधाते वय ४८ वर्ष रा. वडसा 

७) संजय रामकृष्ण मोहदे वय ५४ वर्ष रा. ब्रह्मपुरी

८) मनीषा मोहदे वय ४८ वर्ष

९) श्लोक संजय मोहदे वय १६ वर्ष रा. ब्रह्मपुरी

१०) महेंद्र केवळराम करंबे वय ४४ वर्ष रा. ब्रह्मपुरी

११) मंथला महेंद्र करंबे वय ३४ वर्ष

१२) अर्धाश महेंद्र करंबे वय ७ वर्ष

१३) तुकाराम रामदास चावडे वय ७८ वर्ष रा. ब्रह्मपुरी 

असे जखमी झालेल्यांचे नाव आहे. घटनेचा पुढील तपास नागभीड पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक योगेश घारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक साखरे करीत आहेत.

Previous Post Next Post