Top News

Korpana Police Sub-Inspector Nandkishore Khekade transferred to Chandrapur...

कोरपना पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर खेकाडे यांची चंद्रपूरात बदली......



विदर्भ माझ न्युज 24 - कोरपना  : नितेश केराम , ग्रामीण  प्रतिनिधी 

कोरपना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर खेकाडे यांची जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी बदली करीत त्यांना रामनगर पोलीस स्टेशनसोबत तात्पुरते संलग्नित करण्यात आले आहे, याबाबत 30 ऑगस्टला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाद्वारे पत्र निघाले आहे.

सदर पत्रात बदलीचे कारण हे प्रशासकीय नमूद आहे. मात्र त्यांचा कोरपना येथील कार्यकाळ वादग्रस्त स्वरूपाचा असल्याची चर्चा कोरपना शहरात रंगली आहे.

कोरपना पोलीस स्टेशनमध्ये खेकाडे हे काही महिन्यांपूर्वी रुजू झाले होते मात्र त्यांना पोलीस अधीक्षकांनी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी चंद्रपूर येथील रामनगर पोलीस स्टेशनमध्ये संलग्नित केल्याने शहरात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

Previous Post Next Post