Top News

Mackelwar English Medium School Birsaipeth organized various programs on the occasion of 15th August Independence Day.

म्यॅकलवार इंग्लिश मीडियम स्कूल बिरसाईपेठ येथे 15 ऑगस्ट स्वतंत्र दिना निमीत्य विविध कार्यक्रम संपन्न.....



 विदर्भ माझा न्युज 24 -  झरी 


स्व. शिवण्णाजी म्यॅकलवार बहुउ्देशीय ग्रामीण विकास संस्था द्वारा संचालित म्यॅकलवार इंग्लिश मीडियम स्कूल बिरसाईपेठ इथे 15 ऑगस्ट मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे अध्यक्ष प्रकाशभाऊ म्यॅकलवार, शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा सागर, शाळेचे शिक्षक वृंद. साईकिरण दोंतुलवार, रंजना खडसे, महेश चुक्कलवार, मोहन रजनलवार, सुलताना शेख, आचल मॅडम, तसेच इतर कर्मचारी.पालक वर्ग उपस्थित होते. याप्रसंगी ध्याजारोहन प्रकाश म्यॅकलवार यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षीय भाषण प्रकाश  म्यॅकलवार यांनी केले. मुख्यध्यापिका मंजुषा सागर यांनी 15ऑगस्ट चे महत्व आपल्या भाषणातून सांगितले. विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले..विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीत गाऊन कार्यक्रमांची शोभा वाढविली. कार्यक्रमांची सांगता महेश रजनलवार यांनी आपल्या भाषणातून केली.

Previous Post Next Post