जिल्हा परीषद प्राथमीक शाळा खडकी येते स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा....
विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना
कोरपना तालुक्यातील खडकी येते जि. प. शाळेत 76 वा स्वतंत्र दिनाचा वर्धापन दिन उत्सहात साजरा करण्यात आला विविध उपक्रमांसाठी परिचित असणारी ही शाळा स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव साजरा करण्यात अग्रेसर ठरली महात्मा गांधी , सुभाषचंद्र बोस ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारत माता यांची वेशभूषा केलेली मुल, मुली गावातील जेष्ठ मंडळी माता भगिनी तरुण मंडळी आणि विध्यार्थी सर्वाचा सहभाग मोठ्या प्रमानात होता.
प्रभात फेरी ध्वजरोहन चिमुकल्या मुला - मुलींची भाषने देश भक्तीपर गीतांनी कार्यक्रम साजरा करण्यात आला. शिक्षक तुकाराम यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव वर्षांत स्वातंत्र सैनिकांच्या त्याग आणि बलिदान यांची आठवण करून दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष हरि किनाके अध्यक्ष शाळा समिती ,प्रमुख पाहूणे सौ निर्मला किनाके , दोलत मेसराम, प्रभाकर वरकडे ,अनुसया किनाके ,सोनू तोंडासे ,अर्चना पेंदोर, संकुटराव गेडाम पोलीस पाटील गावातील जेष्ठ नागरिक पालक मोलाचे सहकार्य बापूजी किनाके, करन उरवते यांनी केले समस्त ग्रामवासी यांच्या उपस्थित स्वातंत्र दिन मोठया उत्सहात पार पडला कार्यक्रमाचे संचालन शिक्षक समीर यांनी केले.

