Top News

Selection of Gondia's Ushakiran Atram for International Literary Conference!

आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनासाठी गोंदियाच्या ऊषाकिरण आत्राम ह्यांची निवड !


 विदर्भ माझा न्युज 24 - गोंदिया 

अमृत महोत्सवानिमित्त उन्मेष हा साहित्यिक कार्यक्रम  साहित्य अकादमी दिल्लीचे वतीने दिं ३ ऑगष्ट ते  ६ ऑगष्ट 2023 पर्यंत  भोपाल  येथे आयोजित  केला आहे. या आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात देशविदेशातील 600 साहित्यकारांची निवड केलेली आहे, त्यात  विविध  भाषा व बोलीतून  साहित्यकार निवडतात। ऊषाकिरण आत्राम  या गोंडी साहित्यिक आहे. त्यांनी आतापर्यंत  गोंडी मधुन  कथा कविता सादर  केलेल्या आहेत, या वर्षांत सुध्दा गोंदिया जिल्ह्य़ाला हा मान मिळाला आहे. आदिवासी जिल्ह्य़ातील जेष्ठ लेखीकेची निवड झालेली आहे. त्या गोंडी ,मराठी  व हिन्दी मधुन कविता सादर करतील, या पुर्वी  त्यांना साहित्य अकादमी ने दिल्ली,रांची मराठीत  मुंबई ला बोलाविले होते तर आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलन  सिमला व मागील  वर्षी त्यांना कोलकात्यात झालेल्या उन्मेष साहित्य संमेलनात बोलाविले होते.

ऊषाकिरण या आदिवासींच्या जीवनावर,भाषा संस्कृती ईतिहास  या सोबतच  60चे दशकातील महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या पहिल्या महिला लेखक आहेत। त्या गोंडी मराठी हिन्दी मधुन  कथा कविता नाटक,वैचारिक  लेखन  करतात। त्या अनुवादक असुन  गोंडवाना दर्शन  या हिन्दी पत्रिकेच्या मुख्य संपादक आहेत। त्यांची 15पुस्तके प्रकाशित  आहेत.

9व्या अखिल भारतीय आदिवासी साहित्य संमेलन  नागपुर च्या त्या अध्यक्ष होत्या। तर राज्यस्तरीय 7संमेलनाचे व अनेक कविसंमेलनाचे अध्यक्ष, चर्चासत्र प्रमुख मार्गदर्शक राहिल्या आहे. त्यांच्या कविता कथा महाराष्ट्रातील 10विध्यापिठात अभ्यास क्रमात आहेत। बालभारती व सी  बी एस सी पॅटर्न वर्ग 3री त ही या वर्षी त्यांची कविता पाठ्यक्रमात आहे।

अनेक पुरस्कार प्राप्त असलेल्या ऊषाकिरण  सेवानिवृत्त राजपत्रित अधिकारी होत्या, सध्या त्या धनेगाव कचारगड या गोंदिया जिल्ह्य़ातील जंगलातल्या लहान गावात राहुन  गोंडी, हलबी, भिली, कोरकु, कोलाम, आदि भाषेवरती भाषा शोध संस्थान धनेगाव  येथे काम करतात। 

त्यांची आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात निवड झाल्याबद्दल  मालती किनाके,हेमलता आहाके,प्रा. मानीक  व मिराताई गेडाम,राहुल हटवार, लखनसिंह कटरे,पवन पाथोडे,किरण मोरे,समाधान नेवारे, सह विदर्भ माझा न्युज 24 ने  अभिनंदन  केले।

Previous Post Next Post