हरीश शर्मा यांची भाजपा च्या चंद्रपूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती........
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
बल्हारशाह नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा हे पुन्हा एकदा भाजपा चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाली आहे. याआधी सुद्धा हरिश शर्मा यांनी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी आपला पदभार उत्तमरीत्या सांभाळलेला आहे.
त्यानंतर ते पद देवराव भोंगडे यांनी सांभाळले सध्या संपूर्ण भारतामध्ये भाजपाच्या अनेक पदांची फेरफार होत असतांना जुने जिल्हा अध्यक्ष यांचा कार्यकाल संपलेला होता. त्यावर वर झालेल्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा हरीश शर्मा यांना भाजपाच्या ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यावर भाजपाचे अनेक पदाधिकारी भाजपाचे कार्यकर्ता हरीश शर्मा यांचे चहाते व मित्र मंडळ यांनी प्रथमता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्याअर्पण करून. सर्वांनी एक दुसऱ्याला गोडधोड चारुण जल्लोषात हा आनंद साजरा केला. याप्रसंगी त्या ठिकाणी मनीष पांडे, देवेंद्र वाटकर, किशोर महुर्ले, अरविंद दुबे, कैलास गुप्ता, श्रीनिवास कंदकुरी, राजू दासरवार, राजकुमार श्रीवास्तव, निखिल निंदेकर, प्रकाश दोतपेली, दिनेश कोकुलवार, अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून हरी शर्मा यांना शुभेच्छा देत आनंद साजरा केला.



