Top News

Due to heavy rain, the drain on the drain was washed away.... Many villages in Gowri area lost contact.... Traffic coming to Gowri - Kawthala Kalun Rajura was stopped......

मुसळधार पावसाने नाल्यावरील रफटा गेला वाहून.....


गोवरी परीसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला....


गोवरी - कवठाळा कळुण राजुरा कडे येणारी वाहतुक झाली ठप्प......


विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा


राजुरा तालुक्यातील राजुरा ते कवठाळा मार्गावर येत असलेल्या गोवरी गावात लगत असलेले नाल्यावरील रफटा वाहून गेला दोन दिवसापासून सुरू असलेल्या सतत मुसळधार पावसामुळे नाले तुडुंब भरून वाहू लागले गोवरी गावालगत पुलाचे बांधकाम सुरू असून बाजूला  रफटा बनवून मार्ग सुरू होता.

सवीस्तर वृत्त असे आहे की राजुरा तालुक्यातील गोवरी गावाजवळील असलेल्या मोठ्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम पावसाळा सुरू झाल्यानंतरही पूर्ण झाले नाही. वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेला रपटा मंगळवारी दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याने राजुरा-गोवरी-कवठाळा या मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे गोवरी परिसरातील अनेक गावांचा राजुरा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. 


        राजुरा तालुक्यातील गोवरी गावाजवळ असलेल्या मोठ्या नाल्यावर पुलाचे बांधकाम पावसाळा सुरू झाल्यानंतरही सुरूच आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी तात्पुरता स्वरूपाचा रपटा नाल्यात तयार करून त्यावरून वाहतूक सुरू होती. चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवसापासून पाऊस सुरू आहे. मात्र मंगळवारी दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसाने गोवरी गावाजवळ असलेल्या नाल्यात वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला रपटा पावसात वाहून गेल्याने राजुरा-गोवरी-कवठाळा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. राजुरा-पोवनी-कवठाळा-वनसडी या महामार्गाचे बांधकाम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र त्याचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. त्याचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे.

राजुरात पोलीस स्टेशन मार्गावर ही पाणी.......

जिल्ह्यात काल पासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झाली असून आज सकाळी पावसाने चांगलाच जोर धरला होता  तहसील कार्यालय जवळील नाली चोकअप झाल्याने नालीतील पाणी रस्त्यावरून वाहू लागले होते.  पोलीस स्टेशन, देशपांडे वाडी कडे जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

Previous Post Next Post