Top News

Alert issued...Administration appeals to citizens to be vigilant..... Orange alert for three days and Yellow alert between July 21 and 22. What to do and what not to do during storms, thunder and lightning in the sky....👇🏻 Read more

अलर्ट जारी...नागरीकांना सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन.....


तीन दिवस ऑरेंज तर 21 आणि 22 जुलै दरम्यान यलो अलर्ट....


वादळ, मेघ गर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना  काय करावे आणि काय करु नये....👇🏻 वाचा सवीस्तर




विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)



नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार 18 ते 22 जुलै, 2023 या कालावधीत चंद्रपूर  जिल्ह्यासाठी अलर्ट जारी केला आहे. यात 18 ते 20 जुलै, 2023 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात ऑंरेंज अलर्ट असून या कालावधीत जिल्‍ह्यात सर्वत्र  हल्‍का ते मध्‍यम विजांच्‍या कडकडाटासह वादळ आणि काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्‍याची शक्‍यता वर्तवली आहे. तसेच दिनांक 21 ते 22 जुलै, 2023 या कालावधीत यलो अलर्ट जारी केलेला आहे. या कालावधीत जिल्‍ह्यात सर्वत्र हल्‍का ते मध्‍यम पाऊस पडण्‍याची अत्‍याधिक संभावना व्‍यक्‍त केली आहे. 



खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरीकांनी पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी : संरक्षणात्‍मक कपडे घाला आणि घरात आश्रय घ्‍या. मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा असताना खिडक्‍या आणि दरवाज्‍यापासून दूर रहा. रोडवे, अंडरपास, ड्रेनेजचे खड्डे, सखल भाग आणि जिथे पाणी साठते अशा भागातुन जाणे टाळा. खराब दृश्‍यमानतेमुळे मुसळधार पाऊसात वाहने चालवणे टाळा. पूर आलेला रस्‍ता ओलांडून गाडी चालवण्‍याचा प्रयत्‍न करू नका. पाणी दिसते त्‍यापेक्षा खोल आणि मजबुत असु शकते आणि त्‍यात मोडतोड तीक्ष्‍ण किंवा धोकादायक वस्‍तू, भांडे, छिद्र किंवा विजेच्‍या तारा असु शकतात. पॉवर लाईन्‍स किंवा विजेच्‍या तारांपासून दूर रहा.

            वादळ, मेघ गर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना  काय करावे आणि काय करु नये

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.

विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. जिल्‍ह्यातील नागरिकांनी उचित काळजी घ्‍यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


Previous Post Next Post