Top News

Excellent Sarpanch Nandokishor Gadgai felicitated in 350th Shiva Rajyabhishek ceremony at Rajura......

उत्कृष्ट सरपंच नंदोकिशोर वाढईं यांचा राजुरा येथे 350 व्या शिवराज्यभिषेक सोहळ्यात सत्कार......




 विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा 


श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने स्वागत समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस तथा कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल उत्कृष्ट सरपंच म्हणून सत्कार करण्यात आला. 

       या प्रसंगी कार्यक्रमाचे उदघाट्क हंसराज अहिर, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष, इतर मागासवर्ग आयोग भारत सरकार, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड. संजय धोटे, माजी आमदार तथा अध्यक्ष, शिवराज्यभिषेक सोहळा समिती हे होते.  तर प्रमुख अतिथी म्हणून सुदर्शन निमकर, माजी आमदार राजुरा, अविनाश जाधव, सचिव, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ तथा स्वागताध्यक्ष, शिवराज्यभिषेक सोहळा समिती, सुधीर धोटे, अध्यक्ष, यादवराव धोटे मेमोरीयल सोसायटी राजुरा, संजय पावडे, उप सभापती, कृ. बा. स.राजुरा , खुशाल बोन्डे, चंद्रपूर लोकसभा क्षेत्र विस्तारक, नंदकिशोर वाढई, सरपंच ग्रा. पं. कळमना, सुरेश केंद्रे, महेश देवकते, निलेश ताजणे, सतीश उपलंचिवार, राधेश्याम अडानिया, आशिष करमरकर, स्वप्नील मोहुर्ले, आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल बेले, महासचिव, शिवराज्यभिषेक सोहळा समिती, डॉ. दिनेश दुर्योधन यांनी केले. प्रास्ताविक अविनाश जाधव, स्वागताध्यक्ष यांनी तर आभार प्रा. इर्शाद शेख यांनी मनले.

Previous Post Next Post