Top News

Chandrapur-Vani-Arni Lok Sabha Constituency's by-elections have been instructed to prepare.....

चंद्रपूर - वणी - आर्णी लोकसभा मतदार संघ्याच्या पोटनिवडणुकीसाठी तयारी करण्याचे दिले निर्देश.....


निवडणूक आयोगाचे पत्र धडकले....




विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)

१३ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची संभाव्य पोटनिवडणूक - २०२३,निवडणूकीचे साहित्य उपलब्ध करुन देणेबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, चंद्रपूर यांना मुख्य निवडनुक अधीकारी,महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालयातुन देण्यात आल्या आहेत. 

13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान सदस्य बाळू धानोरकर यांचे निधन झाल्यामुळे सदर रिक्त झालेल्या जागेकरिता भारत निवडणूक आयोगामार्फत नजीकच्या काळात निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच, सदर निवडणूकीचे संचलन करण्याकरिता या कार्यालयामार्फत खालील साहित्याचा पुरवठा करण्यात येईल.



1. शपथपत्र (Form 26 )


2. नामनिर्देशन पत्र (Form 2A)


3. Form A and Form B


4. निवडून आलेल्या उमेदवाराला द्यावयाचे प्रमाणपत्र (Form 22)


5. बोटाला लावायची शाई


6. सुधारित पिंक पेपर सील


7. सुधारित ग्रीन पेपर सील


13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची पोट निवडणूक जाहीर झाल्यास आपल्याकडे पुनर्वापर करण्याजोगे निवडणूक साहित्य आहे किंवा कसे याबाबत तात्काळ आढावा घेण्यात यावा. तसेच ज्या साहित्याची आवश्यकता आहे याबाबतची अंदाजित मागणी या कार्यालयाकडे करण्यात यावी, ही विनंती अ. अ. खोचरे  कक्ष अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग यांनी केली आहे.

Previous Post Next Post