Breaking News : मध्यरात्री झोपेत अस्वलाच्या हल्ल्यात छगण खडसे गंभिर जखमी........
रात्री अस्वलाने केला प्राणघातक हल्ला....
विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी
आर्णी तालुक्यातील दक्षिण वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या वरुड (तुका) तेथे काल मध्यरात्री १२:३० वा. गावात येऊन झोपेत असलेत्या व्यक्तीवर हल्ला चढविला असुन सदर व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे, वरूड( तुका ) येथिल बारामाही वनमजुर श्री छगन खडसे हा आपल्या घरी गाढ झोपेत असतांनाच रात्रीच्या सुमारास अचानकच अस्वलाने गावात प्रवेश केला व छगन खडसे या व्यक्तीवर हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याने तातडीने भ्रमणध्वनीवरून चालकाला कळविले असता वनविभागाची शासकीय गाडी त्वरित चालकांनी रात्री दोन वाजताच्या सुमारास वरुड (तुका)वरून यवतमाळ पर्यंत पोहोचवण्याचे काम शर्यतीने चालक शेख नासीर यांनी केले . प्राथमिक आरोग्य केंद्र सावळी सदोबा येथे उपचार करून,रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला वैदयकिय रुग्णालय यवतमाळ येथे हलविण्यात आले असून,रुग्णांची त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे,त्यांना यवतमाळ येथील रुग्णालयात भरती करण्यात आले डोक्यावर जबरदस्त हल्ला केल्याने त्याच्या डोक्याला त्याच्या तिष्ण नखाने सपूर्ण डोक्याला फाडून टाकल्या मुळे त्यांना तातडीने यवतमाळ रुग्णालयात हलवण्यात आले घराशेजारील लोकांनी आरडा-ओरडा करुन अस्वलीला गावाबाहेर काढले नंतर आस्वल हा जंगलाकडे धाव घेतल,सदर व्यक्ती वन विभागामध्ये बारमाही वनमजुराचे काम करतो . वनपरिक्षेत्रामधील जंगलामध्ये वन्यप्राण्यासाठी पाण्याची व्यवस्था पानवढे नसल्याने,वन्यप्राणी पाण्यासाठी वस्तीकडे वळतात नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या आधी सुध्दा याच परिसरात एका इसमावर जंगली रानडुकराच्या हल्ल्यामध्ये इसमाचा मृत्यू झाला होता,त्यामुळे या भागात वन्यप्रान्यामुळे दहशद निर्माण झाली आहे, वनविभागाकडून जंगली वन्य प्राण्यांचा कुठलाच बंदोबस्त करण्यात येत नाही, तरी वनविभागाने त्वरित या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करुन जखमी व्यक्तीला त्वरित मदत द्या असी मागणी ग्रामस्या कडून केली जात आहे.
मला माहिती पडताक्षणी मी वैद्यकीय रुग्णालय यवतमाळ येथे बारमाही वनमजूर छगन खडसे यांच्या तब्येतीची विचारपूस करून वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुद्धा पुढील तपासणीसाठी विचारपूस केली असता तब्येतीत सुधारणा होत असल्याचे कळाले .
सी.एस.गावंडे वनपरिक्षेत्र अधिकारी, सावळी सदोबा

