Top News

District, Taluka and City Executives of Adivasi Ving of Congress Committee announced...

काँग्रेस कमिटीच्या आदीवासी वींग ची जिल्हा, तालुका व शहर कार्यकारणी घोषित...... 




विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी 



यवतमाळ येथे पार पाडलेल्या आदिवासी काँग्रेस कमिटीच्या मेळाव्या दरम्यान आदिवासी काँग्रेस कमिटीच्या जिल्हा, तालुका व शहर कार्यकारण्या घोषित करण्यात आल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष पदी  भाऊराव मरापे यांची निवड करून आदिवासी काँग्रेस कमिटीची जबाबदारी त्यांच्या कडे सोपविण्यात आली. तर यवतमाळ शहरची जबाबदारी नगर परिषदचे आरोग्य सभापती नंदू कुडमेथे यांच्यावर सोपविण्यात आली.

हेही वाचा : Breaking News :  बल्हारशाह शहर हत्तेने हादर्ले....

 याच बरोबर इतर तालुका व शहरच्या कार्यकारण्या घोषीत करून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. या प्रसंगी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री . वसंतराव पुरके  तर उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव मेश्राम, एम.के.कोडापे, जिल्हा सरचिटणीस जितेंद्र मोघे,  किरण कुमरे, रमेश भिसनकर हे उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व आदिवासी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या...

हेही वाचा : Breaking News :  बल्हारशाह शहर हत्तेने हादर्ले....

Previous Post Next Post