त्या हल्याचे CCTV फुटेज आले समोर.......
भ्याड हल्याच्या निषेधार्थ आज मुल कडकडीत बंद......
विदर्भ माझा न्युज 24 - मुल
दि.11/05/2023 ला रात्री ९:३० वाजता सुमारास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा मूल परिसरात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेस नेते संतोष सिंह रावत यांचेवर गोळीबार करून प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जिल्हा बँक अध्यक्ष रावत यांना दुखापत झाली.
या गंभीर प्रकरणा मुळे संपूर्ण जिल्हा हादरला असून जिल्हा बँक अध्यक्ष संतोष सिंह रावत यांचे वर करण्यात आलेला भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत यामागील मुख्य सूत्रधार कोण..? याचा तातडीने शोध घ्यावा. जिल्हा बँक अध्यक्ष संतोष रावत यांचे वर हल्ला करणाऱ्यांना तसेच या हल्ल्या मागे मुख्य सूत्रधार कोण..? या प्रकरणाची तातडीने चौकशी करून तात्काळ आरोपी व मुख्य सूत्रधार यांना बेड्या ठोकाव्या अश्या मागण्यांना घेऊन आज मुल शहरात घटनेचा निषेध नोंदवीत शहर कडकडीत बंद ची हाक मुल काॅग्रेस ने दीली आहे.