#गोळीबार_
राजकीय वर्तुळात खळबळ....CDCC बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी केला गोळीबार......
विदर्भ माझा न्युज 24 - मुल
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष कांग्रेस नेते संतोष रावत यांच्यावर काल गुरुवार दि.११ मे रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास मुल येथे गोळीबार झाला. या हल्ल्यात रावत यांच्या डाव्या हाताला गोळी स्पर्शू करून गेल्याने त्यांच्या हाताला गंभीर जखम झाली. हल्लेखोर स्विफ्ट डिझायर गाडीने आले होते. हल्ल्यानंतर हल्लेखोर नागपूर मार्गे पसार झाले.
सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत हे सी.डी.सी.सी.बँक शाखा मुल समोरून आपल्या स्कूटीने जात असतांना बँकेचे समोर काही अंतरावर रोडवर उभ्या असलेल्या स्विप्त गाडी नंबर MH 34 6152 या गाडीत बसून असलेल्या बुरखा धारक व्यक्तीने रावत यांचेवर गोळीबार केला.
गोळी डाव्या हातावर लागली व थोडी दुखापत झाली. गोळी झाडताच गाडी पसार झाली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली. गोळी रावत यांच्या हातावर लागून बाहेर गेल्याने थोडक्यात ते बचावले.
गोळीबार करणारा अज्ञात असून तो फरार आहे. अनेकांनी या घटनेचा निषेध केला आहे. संतोष रावत यांच्यावर गोळीबार का करण्यात आला? कोणत्या हेतूने करण्यात आला? कोणी केला? की हा गोळीबार कुणी घडवून आणला? या प्रश्नाचे उत्तरे मात्र अनुत्तरीत आहे मूल शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडल्याने चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.सदर घटने बाबद मूल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून घटनेचा अधीक तपास पोलीस करीत आहेत.

