Top News

Breaking News...Govt (108) ambulance got stuck while going to the hospital with a patient.....and Mangesh came running to help the patient.....

Breaking News...

सरकारी(108) रुग्णवाहिका चक्क रुग्ण घेऊन रूग्नालयात जातांना पडली बंद.....आणी मंगेश‌ आला रुग्नाच्या मदतीस धाऊन.....



रुग्णसेवक मंगेश पाचभाई यांनी तात्काळ खासगी रुग्णवाहिका उपलब्ध करून वाचवला रुग्णाचा जीव........



विदर्भ माझा न्युज 24 - झरी 


        मुकुटबन येथील शासकीय रुग्णालय येथील 108 ही रुग्णवाहिका रुग्ण घेऊन वणीच्या दिशेने जात असताना अचानक 108 च्या रुग्णवाहिकेत बिघाड आल्याने अडेगाव येथील 65 वर्षीय जेष्ठ नागरिक रामकिसन करलुके  उष्माघाताने बळी पडला असता मुकुटबन येथील डॉक्टरांनी त्यांना वणी येथे हलवण्याचे कळविले 108 चे रुग्णवाहिका रीतसर तिथे उपलब्ध झाली पण ही रुग्णवाहिका वणी जात असताना मधातच एक्सलेटर वायर तुटल्याने बंद पडली शिरपूर येथील रुग्णवाहिका यवतमाळ येथे जाऊन असता ती रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही वनी येथे सुद्धा 108 चे रुग्णवाहिका रुग्ण घेऊन चंद्रपूरला गेली असता रुग्णवाहिका कुठेही उपलब्ध नव्हती अशातच रुग्णसेवक मंगेश पाचभाई  हे  त्या रस्त्याने रात्री गावाकडे  जात असताना नेरड या गावाजवळ 108 रुग्णवाहिका बंद अवस्थेत दिसली आणि त्या बंद अवस्थेत असलेली रुग्णवाहिकेत 65 वर्षीय नागरिक तडफडताना त्यांना दिसला व लगेच त्यांनी मुकुटबन येथील डॉक्टरांना संपर्क केला असता त्यांनी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे सांगितले शिरपूर येथे रुग्णवाहिका ही बाहेर गेली असता वणी येथील रुग्णवाहिका बाहेर गेली असता रुग्णवाहिका सरकारी रुग्णवाहिका कुठेही मिळत नव्हती तेव्हा जनसेवक मंगेश पाचभाई यांनी तात्काळ खाजगी कंपनीतील अधिकाऱ्यांना संपर्क साधून तात्काळ त्या रुग्णाला खाजगी रुग्णवाहिकेत टाकून वणी येथे रूग्नालयात उपचारासाठी पाठवले


आता त्या रुग्णावर पुढील उपचार सुरु आहे.



मंगेश पाचभाई यांच्या कर्तव्यदक्षतेने त्या ज्येष्ठ नागरिकांचे प्राण वाचले व मंगेश पाचभाई यांनी  सुद्धा ज्या खाजगी कंपन्यांनी वेळेवर रुग्णवाहिका मदत केली त्यांचे सुद्धा धन्यवाद मानले आणि 108 रुग्णवाही के संदर्भात डॉक्टरांची कान उघडणे सुद्धा केली की वेळेवर रुग्णवाहिका बंद पडल्यास जीव गेल्यास जबाबदार कोण हा जाब  मंगेश पाचभाई यांनी अधिकाऱ्याला  विचारला..?


अशा तऱ्हेने एका ज्येष्ठ नागरिकांचे प्राण जनसेवक  मंगेश पाचभाई व त्याच्या सहकार्याने  वाचवल्याबद्दल सर्वत्र समाजात कौतुक होत आहे.

Previous Post Next Post