Top News

Selection of Amar Konpattiwar as president of Sawli Shahr Youth Congress.

सावली शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी अमर कोनपत्तीवार यांची निवड......


अमर कोनपत्तीवार यांच्या नियुक्ती मुळे काँग्रेस पक्ष अधिक मजबूत होईल - आमदार विजय वडेट्टीवर यांचे प्रतिपादन.......


पक्षवाढी साठी काम करणार व युवकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल,असे अमर कोनपत्तीवार नियुक्ती प्रसंगी प्रतिपादन.....




  विदर्भ माझा न्युज 24 - सावली 

            स्थानिक सावली शहर युवक काँग्रेस अध्यक्ष पदी नुकतीच अमर कोनपत्तीवार यांची निवड करण्यात आली.या प्रसंगी नागपूर येथे  माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी, त्यांचे अभिनंदन केले व अमर कोनपत्तीवार यांच्या नियुक्ती मुळे काँग्रेस पक्ष सावली शहरात अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला.

            अमर कोनपत्तीवार हे युवा उद्योजक व सावली शहरात एक उत्तम नागरिक म्हूणन सुपरिचित आहेत,लोकांच्या कामाला सतत धावून जाणारे व युवकांमध्ये अमर विशेष लोकप्रिय आहेत, काँग्रेस पक्ष व राजकारणात ते सक्रिय असून सावलीच्या राजकारणातील भावी चेहरा मनून त्यांच्या कडे बघितल्या जाते."पक्षवाढी साठी काम करणार व युवकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल",असे अमर कोनपत्तीवार नियुक्ती प्रसंगी प्रतिपादन केले आहे.

   सावली शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी अमर कोनपत्तीवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या नियुक्तीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले आहे. माजी जि.प.उपाध्यक्ष संदीप गड्डमवार, माजी बांधकाम सभापती जि.प.दिनेश चिटनुरवार, तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष राजू सिद्धम, माजी सभापती प.स. विजय कोरेवार,सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहणे, महिला तालुका अध्यक्षा सौ.उषाताई भोयर, सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यालवार,माजी उपसभापती प.स. राकेश पा.गड्डमवार, नगराध्यक्षा नं.प.सावली सौ.लता लाकडे, उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकार,अध्यक्ष ग्रा.कॉंग.कमिटी मोखाळा अनिल पा.मशाखेत्रि,अध्यक्ष ग्रा.कॉंग.कमिटी लोंढोली दिलीप लटारे,माजी सरपंच निफंद्रा बंडू बोरकुटे ,तालुका युवक काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष आशिष मनबतुलवार,सावली शहर काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष नितीन दुवावार,तालुका युवक काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष  किशोर कारडे,काँग्रेस कार्यकर्ते निखिल सुरमवार,महिला सावली शहराध्यक्षा भारती चौधरी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Previous Post Next Post