Top News

Big news __Party went to the lives of youth..... Four youths died after drowning in Chichdoh barrage

मोठी बातमी__पार्टी बेतली युवकांच्या जिवावर.....


चिचडोह बॅरेज मध्ये बुडून चार युवकांचा मृत्यू





 विदर्भ माझा न्युज 24 - चामोर्शी 
संदीप तेलंग - गडचीरोली जिल्हा विषेश प्रतिनिधी तथा चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी  - 9823737684


रविवारची सुट्टी साजरी करण्या साठी गेलेल्या युवकांचा  वैनगंगा नदीवर असलेल्या चिचडोह बॅरेज मध्ये बुडून चार युवकांचा मृत्यू   झाल्याने सर्वस्त्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सवीस्तर वृत्त असे आहे की, मोनु शर्मा, शुभम लांजेवार, महेश घोंगडे, प्रशांत येलुरे हे मित्र रविवारची सुट्टी आहे म्हणून पार्टी करण्याशाठी गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात वैनगंगा नदीवर असलेल्या चिचडोह बॅरेज मध्ये बुडून चार युवकांचा मृत्यू झाल्याची घटना आज रविवार १४मे रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती पुढे येत आहे.

हे चारही मित्रा १८ ते २५ वयोगटातील असल्याने व घरातील नवयुवक असल्याने सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या आली माहितीनुसार चामोर्शी तालुक्यात वैनगंगा नदीवर असलेल्या चिचडोह बॅरेज वर काही मित्रमंडळी रविवार १४ मे रोजी पार्टी करण्याकरिता गेले असल्याचे कळते. दरम्यान त्यातील काहींना पाण्यात पोहण्याचा व आंघोळ करण्याचा मोह न आवरल्याने त्यांनी पाण्यात प्रवेश केला. पाण्याची खोली न कळल्याने चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सदर घटनेची माहिती पोलीस ठाण्यात कळविण्यात असून या घटनेने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.. सदर घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Previous Post Next Post