मुकुटबंन येथे रक्तदान शिबिर आयोजित केल्याबद्दल पोलीस निरीक्षक अजित जाधव यांचा परिसरातील नागरिकांकडून जाहीर सत्कार....
पोलीस विभागाच्या वतीने मुकुटबंन येथे केलं रक्तदान शिबिरात 200 च्या वर रक्तदात्यांचे या रक्तदान
जनसेवक मंगेश पाचभाई ,नारायन गोडे,नरेंद्र पावडे आझाद उदकवार इतर परिसरातील नागरिकांकडून सत्कार संपन्न....
विदर्भ माझा न्युज 24 - झरी
पोलीस यवतमाळ जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने डॉक्टर पवन कुमार बनसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ यांचे नेतृत्वात जिल्हाभर रक्तदान शिबिराचे आयोजन विभागीय कार्यालयात केल्या आहे पण मुकुटंबन पोलीस निरीक्षक निरीक्षक अजित जाधव यांनी स्वकल्पनेतून आपल्या पोलीस स्टेशन मुकुटंबन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन मुकुटबंन येथे केले असता ज्या नागरिकांना रक्तदान करण्याकरीता वणी जायला लागत होतं ते अंतर वाचून मुकुटबंन पोलीस ठाण्यात भव्य असं रक्तदान शिबिर पाटण व मुकुटबंन पोलीस स्टेशन यांच्या वतीने मुकुटबंन येथे ठेवण्यात आले होते.
सदर शिबिरात परिसरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद देत या रक्तदान शिबिरात 200 च्या वर रक्तदात्यांनी रक्तदान केलं होतं भर उन्हात हे रक्तदान शिबिर माननीय अजित जाधव यांचे नेतृत्वात मोठ्या संख्येने रक्तदाते रक्तदान करत होते 43/ 44 डिग्री सेल्सिअस पारा असतांना सुद्धा मुकुटबंन परिसरातील अजित जाधव यांना मानणारा चाहता वर्ग तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात रक्तदान करतांना दिसत होता,
सदर रकदान शिबिरात पत्रकार सामाजिक कार्यकर्ते सरपंच पोलीस पाटील ग्रामपंचायत संघटना इतर सर्व मित्रमंडळी सहकारी संघटना या रक्तदान शिबिरात भरभरून रक्तदाते घेऊन रक्तदान करत असतांना चीत्र पहाता परिसरातील नागरिकांनी त्यांचा याच कार्यक्रमात सत्कार करायचा ठरवलं आणि आडेगावचे सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई, आझाद उदकवार ,सामाजिक कार्यकर्ते नारायण गोळे, रफिक कनोजे राहुल ठाकूर प्रणल गोंडे धनंजय पाचभाई ,व त्यांच्या सर्व युवा टीमने माननीय अजित जाधव व त्यांचे सहकारी पोलीस स्टेशन मुकुटबंन पाटण यांचा नागरिक सत्कार केला.

