मुख्य रस्त्यावर गिट्टीने भरलेला टिप्पर उलटला...सुदैवाने जीवित हानी टळली....
विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी
आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा येथील मुख्य रस्त्याचे काम चालू असून,या रस्त्यावर असलेला जुन्या रपटा खसल्याने, व रस्त्याचे काम चालू असल्यामुळे रस्ता एकतर्फी असल्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर रहदारी होत आहे, या रहदारीमुळे जुन्या असलेल्या पूल पूर्णता खचला असल्याने,त्यावरून जाणारा टिप्पर,टिपर क्रमांक -MH 29-T1491 या क्रमांकाचा गिट्टीने भरलेला असल्यामुळे टीप्पर रस्त्याच्या मधोमध असलेल्या व खचलेल्या रपट्यात जाऊन पलटी झाल्याने रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या मोटरसायकलवर हा टिप्पर ऊलटला झाल्याने मोटरसायकलचे नुस्कान झाले आहेत,सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नाही.
लवकरच जेसीपी मशीन बोलून पलटी झालेल्या टिप्परला घटनास्थळावरून हटवून रहदारीसाठी रस्ता खुला करण्यात आला, घटनास्थळी पारवा पोलीस स्टेशनचे पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळावर येऊन रहदारीचा रस्ता मोकळा करून दिला, रस्त्याचे काम चालू असल्यामुळे वाहनधारकांना एकतर्फी वाहन चालवावे लागत आहे, त्यामुळेच अपघाताच्या घटना घडत आहे,अतिशय संत गतीने चालू असलेल्या या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाने गती देऊन लवकर या रस्त्याचे काम करण्यात यावे,आणि होणाऱ्या अपघात टाळावा अशी या परिसरातील नागरिकांची मागणी केली आहे.

