बल्हारशाह शहरातील व्येंकटेश एम्पायर मधील महाकाली फॅन्सी गिफ्ट अँड लेडीज कॉर्नर ला भीषन आग......
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
दिनांक 27/3/2023 ला शहरातील मेन रोड नवीन बस स्थानक चा बाजूला असलेल्या व्यंकटेश एम्पायर मधील महाकाली फॅन्सी गिफ्ट अँड लेडीज कॉर्नर ला आग लागून पूर्ण दुकान जळून खाक झाल्याची घटना शहरात घडली. सकाळी चार चा दरम्यान काही लोकांनी पाहिले असता त्यांनी पोलिसांना कळवले पोलिसांनी अग्नीशामक विभागाच्या मदतीने दुकानाला लागलेली आग आटोक्यात आणली.
दिवस निघाल्या नंतर पाहिले असता दुकानातील सर्व वस्तू जळून खाक झाले होते. आणि बाजू चा शटर चे ताले तोडून शटर वर करून होते या वरून असे दिसून येते की चोरांनी शटर तोडून आत घुसले आणि काही नगद रक्कम न मिळाल्याने आग लावली असावी असा आंदाज व्यक्त केल्या जात आहे.
बल्हारशाह पोलीस आग कशी लागली याचा शोध घेत आहे. काही दिवसांपासून शहरात चोरीचे प्रमाण वाढले आहे कोळसा चोरी, भंगार चोरी, गाडी चोरी, पेट्रोल चोरी, घरफोडी, दुकान फोडी, काही दिवसा अगोदर मेन रोड वरती एकाच दिवशी चार-पाच दुकाना चे ताले तोडले गेले त्यात काही न मिळाल्याने वाघमारे किराणा दुकानातून चोरी झाली होती. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करावे अशी शहरातील नागरिकांची मागणी आहे.
