Top News

Deputy Chief Minister Devendra Fadnavis along with 10 MPs from Vidarbha village barricaded – VRAS Determination of Vidarbha activists: Protest on 1st May Maharashtra Day, Stop Coal Movement at Umred.....

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह विदर्भातील दहा खासदारांना गावबंदी – विराआंस 


विदर्भवाद्यांचा निर्धार : १ मे महाराष्ट्र दिनाचा निषेध,उमरेड येथे कोयला रोको आंदोलन.....


 


विदर्भ माझा न्युज 24 - नागपूर 

विदर्भ राज्य आंदोलन समिती कोअर कमेटी बैठक दि. २६/०३/२०२३  रोजी नागपूर येथील मुख्यालयात घेण्यात आली. मिशन २०२३ अंतर्गत स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्या करता नुकतीच पार पडलेली विदर्भ निर्माण यात्रा  पूर्व – पश्चिम विदर्भातून ज्या तालुक्यातून गेली नाही अश्या प्रत्येक तालुक्यात तालुकास्थळी १ जाहीर सभा घ्यावी व तालुक्यात एक विदर्भ निर्माण यात्रा गावोगाव काढावी व आंदोलन तळागळापर्यंत पोहचवावे. संपूर्ण तालुक्याच्या तालुका यात्रा संपल्यानंतर १ जाहीर सभा जिल्हा मुख्यालयी आयोजित करावी. 

विदर्भ राज्याचा युवा जागर करणारे व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह जिल्ह्यातील खासदारांना तसेच जिल्ह्यात येणाऱ्या सर्व केंद्रीय मंत्र्यांना गावबंदी करून विदर्भाचे राज्य केव्हा देणार ? असे प्रश्न विचारावे. जिल्हा/ तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा आंदोलनातील सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने युवकांच्या बैठका घेऊन विदर्भातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवने. स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव जे खासदार संसदेत व त्यांच्या पक्षाच्या अजेंडामध्ये घेणार नाहीत त्यांना विदर्भातील जनतेने मतदान करू नये, याकरीता जनतेमध्ये जाऊन जनजागृती करावी. १ मे २०२३ ला महाराष्ट्र दिनी महाराष्ट्र दिनाचा निषेध म्हणून केंद्र सरकारला विदर्भाच्या जनतेच्या भावना कळविण्याकरीता व विदर्भाच्या संपत्तीचे दोहन थांबविण्याकरीता उमरेड जवळील WCL (कोळसा खाणी) समोरील रस्त्यावर कोयला रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोअर कमिटीच्या बैठकीला संबोधित करतांना विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ऍड. वामनराव चटप म्हणाले “आम्ही विदर्भाच्या जनतेला ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत विदर्भाचे स्वतंत्र राज्य मिळवून देण्याचे वचन दिले आहे, हे आंदोलन निर्णायक टप्प्यावर आले आहे त्याकरीता आम्हाला प्राण पणाला लावून लढायचं आहे, आजपर्यंत २२० च्या वर आंदोलने केली परंतु ज्यांनी विदर्भाचे स्वतंत्र राज्य देऊ अशी कबुली दिली आज ते मुंग गिळून बसले आहे. येणाऱ्या निवडणुकीत त्यांना हद्दपार करू” असे आवाहन करत नारा दिला "तुम्ही आम्हाला साथ द्या, आम्ही तुम्हाला विदर्भाचे स्वतंत्र राज्य देऊ."

बैठकी दरम्यान माजी पोलीस आयुक्त डॉ. दिलीप झळके पाटील यांची कोअर कमेटी सदस्य, डॉ. विजय शहारे यांची सहसचिव भंडारा जिल्हा, रवींद्र गजभिये यांची उमरेड विधानसभा प्रभारी, नरेंद्र काळे यांची नागपूर प्रभाग क्र. २७ अध्यक्ष, कविता गजभिये यांची कुही तालुका महिला आघाडी अध्यक्षा, लताबाई अवजेकर यांची दक्षिण नागपूर महिला आघाडी सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.


कोअर कमेटी बैठकीला विदर्भ प्रदेश महिला अध्यक्षा रंजना मामर्डे, जेष्ठ नेते डॉ.श्रीनिवास खांदेवाले, पूर्व विदर्भाचे अध्यक्ष अरुण केदार, युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष मुकेश मासुरकर, कोर कमेटी सदस्य तात्यासाहेब मत्ते, विष्णुपंत आष्टीकर, माजीमंत्री डॉ. रमेश गजबे, प्रा. प्रभाकर कोंडबत्तूनवार, माजी पोलीस आयुक्त डॉ. दिलीप झळके पाटील, प्रा. पुरुषोत्तम पाटील, बळीराजा पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र धावडे, राजेंद्रसिंग ठाकूर, दिवाकर भोयर, राजेंद्र आगरकर, दिलीप भोयर, श्रीकांत दौलतकार, किशोर दहेकर, सुखदेव पात्रे, कपिल ईद्दे, अंकुश वाघमारे, रफिक रंगरेज, प्रगती भोसले, अशोक कपिले, यशवंत चिंतले, नासिर जुम्मन शेख, अयुब शेख, घिसू खुणे पाटील, प्रा. मनीषा तिरपूडे, सतीश प्रेमलवार, हरिभाऊ पानबुडे , माधुरी चौहान, ऍड. मृणाल मोरे, अनिल तिडके, नरेश निमजे, गणेश शर्मा, अशोक पाटील,रवींद्र गजभिये, एड. विनोद बोन्दाडे, लक्ष्मण धेंडवाल, सुरेश हेडाऊ, वासुदेव मासुरकर, ऍड. रेवाराम बेलेकर, अनिल केशरवानी, मितीन भागवत, गणेश कुसराम, मनीष वासे, गिता निमगडे, वंदना गेडाम, वैशाली रामटेके, ऍड. तेजल निमगडे, लता अवझेकर, ईश्वर देशभ्रतार, हेमंत मरकाम, राहुल बनसोड, मनू दत्ता, प्रशांत तागडे सह अन्य उपस्थित होते.

Previous Post Next Post