चंद्रपूरच्या कृषी महोत्सवात दिसली सरपंचांची एकजूट
चंद्रपूर जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच 800 पेक्षा अधिक सरपंच उपसरपंच होते उपस्थित
अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांनी ऐकून घेतल्या सरपंचांच्या समस्या.
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
धनोजे कुणबी समाज आयोजित कृषी महोत्सव 2023 मध्ये सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील बहुसंख्य सरपंच उपसरपंच सरपंच परिषदेला उपस्थित होते. अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक जयंत पाटील सरपंचांना मार्गदर्शन करताना म्हणाले की विधान परिषद सभागृहात सरपंचाचा आमदार असावा. सरपंच उपसरपंच मानधनात वाढ व्हावी. मंत्रालयात सरपंचाना सम्मान मिळाला पाहिजे.सरपंच हा ग्राम विकासाचा कणा आहे. कार्यक्रमाचे प्रास्तविक पर भाषणात अखिल भारतीय सरपंच परिषदेचे विदर्भ अध्यक्ष अॅड देवा पाचभाई यांनी सरपंचानी स्वतःचा आत्मसम्मान जपण्याचा संदेश दिला. सरपंच परिषदेच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा परिषद चंद्रपूर माजी सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा श्रीधरराव मालेकर तर उदघाट्क माजी आमदार सुदर्शन निमकर
होते. मुख्य मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील तर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून राज्य सल्लागार तथा जिल्हाअध्यक्ष प्रा राजेंद्र कराळे होते.प्रमुख अतिथी म्हणून
अॅड. पुरुषोत्तम सातपुते धनोजे कुणबी समाज अध्यक्ष चंद्रपूर रविंद्र शिंदे विधानसभा प्रमुख शिवसेना.प्रा खुशाल रामगिरकर प्रविण प्रशिक्षक यशदा पुणे. अॅड जयश्री सातपुते संचालक नजदिक संघटना.प्रकाश खरवडे जिल्हा अध्यक्ष ग्रामसेवक युनियन.डॉक्टर अभिलाषा गावतुरे बेहरे.अॅड विलास माथनकर ओबीसी सेवा संघ अध्यक्ष. रंजित डवरे माजी उपसभापती विजय बल्की माजी सभापती. नंदकिशोर वाढई विदर्भ सरचिटणीस अखिल भारतीय सरपंच परिषद.सतीश नंदगीरवार गडचिरोली जिल्हा प्रभारी अखिल भारतीय सरपंच परिषद. पुरुषोत्तम आस्वले. प्रा अनिल डहाके तर कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता अखिल भारतीय सरपंच परिषदेचे सर्व तालुका अध्यक्ष व पदाधिकारी. जिल्हा कार्यकारणी कृषी महोत्सव आयोजन समितीचे पदाधिकारी सर्वांनी मेहनत घेतली.


