कळमना येथे नाली व रस्ता बांधकामाचे भुमीपुजन.
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे 15 वित्त आयोगाच्या विकास निधी अंतर्गत नाली व सी सी रस्ता बांधकामाचे भुमीपुजन करण्यात आले. कळमनाचे सरपंच, अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस तथा ओबीसी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते भुमीपुजन करण्यात आले.
या प्रसंगी नंदकिशोर वाढई यांनी गावाला पायाभूत सुविधा निर्माण करून कळमना हे गाव स्वच्छ सुंदर हिरवेगार व पर्यावरण युक्त करण्याचा संकल्प केला आहे. या प्रसंगी उपसरपंच कौशल्य कावळे, ग्रामपंचायत सदस्य साईनाथ पिंपळसेंडे, सुनिता उमाटे, रंजना पिंगे, तंटामुक्ती अध्यक्ष निलेश वाढई , माजी तंटामुक्ती अध्यक्ष महादेव ताजने, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष पुंडलिक पिंगे, उध्दव आस्वले, कवडु पाटील पिंगे, ग्रामसेवक नारनवरे, मुख्यधापक धानकुटे सर, पेदोर सर, गोखरे मॅडम, दुधे मॅडम, देविदास उमाटे, रामचंद्र कुकडे, पंडीत गेडाम, वाघाडे, कवडु मुठलकर, अनिल मेश्राम, एकनाथ भोयर, आकाश चापले, शिपाई सुनील मेश्राम, विशाल नागोसे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


