मुल येथील त्या 19 लाखाच्या चोरीचा शोध लावण्यास स्थानिक गुन्हे शाखेला अखेर यश.......
विदर्भ माझा न्युज 24 - मुल
दि.16 मार्च 2022 रोजी फिर्यादी दिनेश प्रकाश चलाख वय 33 वर्षे रहानार सिंतळा मुल व त्यांचा मित्र अक्षय विलास गोवर्धन वय 27 वर्षे रहानार शिवाजी नगर वार्ड क्रमांक 77 मुल जिल्हा चंद्रपूर हे दोघे त्यांचे मालक दिनेश गोयल यांचे महालक्ष्मी ट्रेडींग कंपनी ची विवीध ठिकाणावरून वसुली करून परत येत असतांना अंदाजे 9.45 वा ते 10.00 वा. दरम्यान चंद्रपूर मुल रोडवरील जानाळा ते डोणी फाट्याजवळ मागुण येणाऱ्या मोपेड मोटार सायकल वरील दोन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीचे गाडीचे हॅन्डल पकडून खाली पाडुन त्यांना मारहाण करून त्याचे जवळील 18,93,520 /-रू.ची नगदी रोकडची बॅग जबरीने हिसकावून पळाले होते.
अशा फेर्यादीचे रिपोर्ट वरून पोलिस स्टेशन मुल अप्पर क्रमांक 154 ,/2022 कलम 394 भांदवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांचे आदेशान्वये बाळासाहेब खाडे पोलिस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा यांचेकडे देण्यात आला.
दि.20 जानेवारी 2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना गोपनिय माहिती मिळाली की, मुल येथील 1) केतन अशोक बुटले वय 23 वर्षे व तोहीद आरीफ शेख वय 24 वर्षे दोन्ही रहानार वार्ड नं.17 ताडाळा रोड मुल जिल्हा चंद्रपूर यांनी सदरचा गुन्हा केला आहे, त्या अनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पोलिस हवालदार नितीन साळवे, प्रकाश बल्की, प्रमोद डंबारे, ना.पो.कॉ.सुभाष गोहोकार 814, पो.कॉ.सतिश
बगमारे, यांचे पथक गठीत करून नमुद आरोपीतांवर गोपनिय पाळत ठेवली असता ते मिळून आले.त्यांना गुन्ह्या बाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.आरोपीने चोरीचे रोकडमधुन खरेदी केलेले
1) 4, लाख रू. एक लाल रंगाची वरणा चारचाकी वाहन जुनि वापरती वाहन क्र.एम.एच.40 एसि 6354
2) 2,25,000,/-रू. एक जुनी वापरती खाकी रंगाची बुलेट मोटार सायकल क्र.एम.एच.34 बिएस 8333 तसेच गुन्हयात वापरलेले वाहन
3) 1 लाख -रू. एक जुनी लाल रंगाची मारोती 800 चारचाकी वाहन क्र. एम.एच. 31 झेड 3789
मालमत्ता आरोपीतांकडून हस्तगत करण्यात आली. आरोपींचा पि.सि.आर.घेवून उर्वरीत मालमत्ता हस्तगत करण्यात येत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पो.हवा. नितीन साळवे, प्रकाश बल्की, प्रमोद डंबारे, ना.पो.कॉ.सुभाष गोहोकार 814, पो.कॉ. सतिश बगमारे यांनी केली असुन गुन्ह्याचा पुढील तपास बाळासाहेब खाडे, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर हे करीत आहे.

