बेलदार समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात विवाह सोहळा व वधू-वर परिचय मेळाव्याचे २१ व २२ जानेवारीला आयोजन.....
विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपुर (चांदागड)
विदर्भ बेलदार व तत्सम समाज संघटना जिल्हा चंद्रपुर व शहर शाखेचे विद्यमाने १९ वे राज्य स्तरीय अधिवेशनात दोन झोडप्यांचे विवाह सोहळा व वधु-वर परिचय मेळावा चंद्रपुरात आयोजीत करण्यात आला आहे.२१ व२२ जानेवारी रोजी चंद्रपुर-नागपूर मार्गांवरील शकुंतला फार्म/लाॅन येथे होणारे अधिवेशनात राजयभरातून ५००० चे वर समाजबांधव हजेरी लावणार आहे.
२१ जानेवारी ला पहिले सत्रात सकाळी 10.00 वाजता सामुहीक विवाह सोहळा संपन्न होणार आहे.दुसरे सत्रात सांस्कृतीक कार्यक्रम होईल.सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रभा चिलके व उदघाटन श्रीमती रजनी अनिल ठाकूरवार यांचे हस्ते होईल याप्रसंगी आमदार प्रतिभा धानोरकर वरोरा ,वैशाली पुल्लावार यांची उपस्थिती राहील.
२२ तारखेला १९ वे राज्स्तरीय अधिवेशनाचे उदघाटन डाॅ.सुभाष रेड्डीवार मुल यांचे हस्ते होणार आहे.अध्यक्षस्थानी माजी आमदार वणी राहतील.प्रमुख मार्गदर्शक राज्याचे मंत्री व जिल्ह्याचे पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार व राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर राहतील
या प्रसंगी विदर्भ बेलदार व तत्सम समाजाचे प्रांतीय अध्यक्ष चंद्रशेखर कोटेवार, डाॅ.सुनिल कुल्दीपवार, विजय मूत्यालवार,विजय ठाकुरवार, सागर ठाकुरवार, सुनिल संकुलवार , पंकज नन्नेवार ईतयादी,
नगर सेवक अनिल बोरगमवार व प्रांतीय कार्यकारीणीचे समस्त पदाधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत दूसरे सत्रात वधु-वर परिचय मेळावा व विविध भेटवस्तू ड्राॅ चे वितरणाने मेळावा संपन्न होईल.
मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे प्रांतीय पदाधिकारी आनंदराव अंगलवार, रविंद्र बंडिवार, चंद्रपुर प्रमोद एडलावार, चंद्रपुर जिल्हा पदाधिकारी आनंद कार्लेकर, मनिष कन्नमवार, आरती अंकलवार, मंगला बंडिवार,ऋचा आडपेवार व शहर पदाधिकारी सचिन चलकलवार , पवन कन्नमवार, अपर्णा अंगलवार,मनिषा कन्नमवार, दिपाली बंडीवार, इत्यादिनी एका पत्रकाद्वारे आवाहन करित आहे.

