विदर्भ राज्य आंदोलन समितीची विदर्भ निर्माण यात्रेची तारीख जाहीर.......मिशन २०२३ अंतर्गत आंदोलनाचा दुसरा टप्पा ॲड.वामनराव चटप यांनी केला जाहीर.....
ॲड.वामनराव चटप यांचे आव्हान जलसंपदा विभागाचे विदर्भात १ काम दाखवा १ लाख मिळवा......
विदर्भ माझा न्युज 24 - नागपूर
दिनांक १९ डिसेंबर २०२२ ला नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अर्थमंत्र्यांकडून सादर करण्यात आलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात जलसंपदा विभागाच्या मागण्यांतून विदर्भ गायब झाला असून कायमचा हद्दपार करण्यात आला आहे. दुर्दैवाने राज्याचे अर्थमंत्री व जलसंपदा मंत्री विदर्भातील, मूळ गाव मुल' चेच असताना नागपूर वरून राज्याच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व करणार्यांनी "कुऱ्हाडीचे दांडे गोतास काळ" हा रोल पूर्णपणे अदा केला असल्याचे दिसून येत असून विदर्भातील एक ही काम या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आले नाही त्यामुळे जलसंपदा विभागाचे विदर्भात १ काम दाखवा १ लाख मिळवा अशी भूमिका विदर्भ राज्य आंदोलन समितीने जाहीर केली असून त्या आशयाचे फलक जिल्ह्या जिल्ह्यात लावण्याचा निर्णय ही कार्यकारिणीत जाहीर केली आहे.
जलसंपदा विभागाच्या पूरक मागण्या व विनियोजानात विदर्भातील ११ ही जिल्हे, १२० तालुके व ६२ विधानसभा मतदारसंघात जलसंपदा विभागाचे एकही काम समाविष्ट न करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा अर्थ, नियोजन व जलसंपदा मंत्री यांनी विदर्भाचे जलसंपदा विभागाचे एकही काम समाविष्ट न करून विदर्भ द्वेष आचरणातून दाखवून दिला आहे.
त्यांच्या या कृतीचा विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने दि. १८ जानेवारी २०२३ ला कोअर कमिटीच्या बैठकीत जाहीर निषेध करण्यात आला.
कोअर कमिटीच्या बैठकीत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या द्वारे, दि. २१ फेब्रुवारी २०२३ पासून ते ५ मार्च २०२३ पर्यंत पूर्वेकडील कालेश्वर (सिरोंचा) येथून १ प्रचार यात्रा निघणार असून दुसरी प्रचार यात्रा जिजाऊचे माहेर असलेल्या (सिंदखेड राजा) येथून निघणार असून दोन्ही प्रचार यात्रेचा समारोप ५ मार्चला नागपूर येथे होणार आहे व याद्वारे संपूर्ण विदर्भभर जन जागृती करून विदर्भाचे आंदोलन तीव्र करण्याची भूमिका यातून जाहीर केली जाणार आहे.
कोअर कमिटीच्या बैठकीला प्रामुख्याने ॲड. वामनराव चटप, प्रकाशभाऊ पोहरे,रंजनाताई मामर्डे, अरुण केदार, मुकेश मासुरकर, कोअर कमिटी सदस्य, तात्यासाहेब मत्ते, अनिल बोबडे, सुयोग निलदावार, किशोर कामुने, भगवान झंझाड, डॉ. रमेश गजबे, अशोक धापोडकर, दादाजी फुंडे, मोरेश्वर बोरकर, नीलकंठराव घवघवे, निलकंठराव यावलकर, रेखा निमजे, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा सुधा पावडे, प्रभाकर कोंडबत्तुनवार, सुनीता येरणे, अशोक पाटील, अनिल तिडके, राजेन्द्र आगरकर, कृष्णराव भोंगाडे, राजेंद्र सिंह ठाकूर, सुरेश जोगळे, मधुसूदन हरणे, कपिल इद्दे, उल्हास कोटमकर, सुदाम राठोड, सरला सपकाळ, सुखदेव पात्रे, विनोद भाबरे, विश्वपाल हजारे, नागपूर शहर उपाध्यक्ष प्यारूभाई उर्फ नौशाद हुसैन, ज्योती खांडेकर, गणेश शर्मा, महासचिव नरेश निमजे, राजेंद्र सतई, वीणा भोयर, शोभा येवले, विजय मौदेकर, यशवंत चिंतले गुरुजी, वीरेंद्र इंगळे, पंकज साबळे, अंकुश वाघमारे, रमेश नळे, हर्षा सगणे, अशोक कपिले, राम शेगावकर सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
