बल्हारशाह शहरातील टेकडी विभागात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या.......प्रेम प्रकरणातुन केली आत्महत्या....
आत्महत्येला प्रवृत्त केरणार्या दोन्हीं भावान वर गुन्हा दाखल........
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
बल्हारशाह शहरातील टेकडी विभागा अंतर्गत डाॅ.राजेंद्र प्रसाद वार्ड येथील रहीवाशी नामेये भी पठीये 👉🏻 भाई नागेश तु गुटखा मत खा....और अक्षय तु मुझे अपना बिजनेस पार्टनर बनाले.- अभिनेता सोनु सुद युवकाने स्वताच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
सविस्तर वृत्त अशे आहे की दि. 16/1/2023 रोजी सायंकाळी 4:30 ते 5:00 वाजता च्या दरम्यान बल्हारशाह शहरातील टेकडी विभागा अंतर्गत डाॅ. राजेंद्र प्रसाद वार्ड येथील राहणाऱ्या प्रशिक संजय भसारकर वय २१ या युवकाने घरी कोणीही नसतांना दुपट्याच्या साहाय्याने स्वयंपाक खोलीत गळफास लावून आत्महत्या केली.
ह्या आत्महत्येला टेकडी विभागातीलच कारवा रोड येथील अमर तेलंग व दर्शन तेलंग हे दोघे कारणीभूत असून त्यांनीच प्रशिक भसारकर ह्याला आत्महत्येस प्रवृत्त केले असा आरोप नातेवाईक व परिसरातील नागरीकांनी केला होता.
अखेर सर्व नातेवाईक व परिसरातील नागरीकांनी पोलीस ठण्यासमोर एकत्रित येऊन त्या दोन्ही भावंडांवर गुन्हा दाखल करण्यासाठी ठाण मांडल्यानंतर बल्हारशाह पोलिसांनी अमर तेलंग व दर्शन तेलंग ह्या दोन्ही भावंडांवर गुन्हा नोंदविला.
प्राप्त माहीती नुसार अमर तेलंग, दर्शन तेलंग व त्यांचे दोन मेहुणे यांनी 21 डिसेंबर रोजी प्रशिक भासारकर याला मक्का मजिद जवळ मारहाण केली व त्यानंतर प्रशिकला जंगलातील कबरस्थान जवळील नाग मंदिर परिसरात नेऊन तिथेही मारहाण करून रक्तबंबाळ करून पसार झाले.
मारहाणीचे वृत्त कळताच मृतकाचा भाऊ साहिल आपल्या मित्रांच्या मदतीने त्याला रक्तबंबाळ अवस्थेत घरी घेऊन आला व बल्हारशाह पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केली ह्यावेळी आरोपी अमरची मेहुणी सुद्धा पोलीस स्टेशन मधे उपस्थित होती व तिने प्रशिकवर आपले प्रेम असुन त्याच्याशी लग्न करायचे असल्याचे सांगितले होतें.
ह्यानंतर आपल्याविरुद्ध दिलेली पोलीस तक्रार मागे घेण्यासाठी अमर व त्याचा भाऊ प्रशिक व त्याच्या कुटुंबातील सर्वांनाच तक्रार परत घेण्यासाठी पाहून घेण्याची धमकी देऊन दबाव टाकत होते. आरोपींकडून मिळणाऱ्या सततच्या धमकी मुळे भयभीत होऊन अखेर 16 जानेवारी रोजी दुपारी चारच्या दरम्यान घरी कोणीही नसल्याचे बघुन प्रशिक घराच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून मागच्या दाराने स्वयंपाक खोलीत गेला व दुपट्टयाच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.
झालेला प्रकार लक्षात येताच मृतकाचे वडील संजय बापूराव भसारकर 49 यांनी तत्काळ बल्हारशाह पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केली. नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी ठिय्या दिल्याने पोलिसांनी प्रशिकच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या अमर तेलंग व दर्शन तेलंग या दोघांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी भादंवी कलम 306, 34 अन्वये गुन्हा दाखल केला असून ठाणेदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एकनाथ राठोड पुढील तपास करीत आहे.
