Top News

State level Krantijyoti Savitrimai award announced to Sandhya Kharatde/Bahade........

मा.संध्या खरतडे/बहादे यांना राज्यस्तरीय क्रांतिज्योती सावित्रीमाई पुरस्कार जाहीर........


विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी 



आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा येथील सौ.संध्या खरतडे/बहादे यांनी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सोबतीने शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात क्रांतिकारी कार्य केले आहे.त्यांच्या विचारांना आदर्श मानून सामाजिक,शैक्षणिक, राजकीय व जनसेवेच्या क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या मा. संध्या खरतडे पर्यवेक्षिका आर्णी यांनी सामाजिक बांधिलकी मानून ते करीत असलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना भारतीय महिला मंच व धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय क्रांतिज्योती सावित्रीमाई पुरस्कार जाहीर झाला आहे.



जवळपास 1750 हून अधिक प्रस्ताव प्राप्त झाले आहे,त्यामधून यांची निवड करण्यात आली.

 भारतीय महिला मंच व धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट या दोन्ही संस्था तथागत बुद्ध, माता सावित्रीमाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, लोकराजे राजर्षी शाहू महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी अभिप्रेत असणाऱ्या प्रबोधनाच्या चळवळींमध्ये कार्यरत आहेत.

राज्यस्तरीय क्रांतिज्योती सावित्रीमाई पुरस्कार समारंभ रविवार दि.29 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 11:00 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे होणाऱ्या पाचव्या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार संजय आवटे, सुप्रसिद्ध कवयित्री दिशा पिंकी शेख,सुप्रसिद्ध कवी व लेखक डॉ. सतीशकुमार पाटील, धम्म अभ्यासक विजया कांबळे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ॲड.मंचकराव डोणे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नंदकुमार गोंधळी, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा ॲड. करुणा विमल,ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे, संविधानाचे अभ्यासक डॉ. श्रीपाद देसाई,ॲड. अकबर मकानदार, निती उराडे, प्रा. प्रकाश नाईक या मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे अशी माहिती संयोजक अनिल म्हमाने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सदर पुरस्कार वितरण समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. दयानंद ठाणेकर, सुरेश केसरकर यांनी केले आहे.

Previous Post Next Post