कळमना येथे प्रजासत्ताक दिन साजरा : मजुराचे हस्ते ध्वजारोहण.
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
आज दिनांक २६ जानेवारी रोजी ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कळमना येथे ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच नंदकिशोर वाढई यांनी ध्वजारोहण स्वतः न करता यावर्षी ध्वजारोहण करण्याचा मान गावातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे करणारे मंजुर नत्थु वसाके याना देला. श्री. वसाके यांच्या हस्ते कळमना ग्रामपंचायत कार्यालयात धवजारोहण करण्यात आले. कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई हे एक उपक्रमशील सरपंच असून गावासाठी आणि परिसरातील नागरिकांसाठी ते सतत काही नवनवीन उपक्रम राबवित असतात. यावेळी त्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे. या प्रसंगी सरपंच नंदकिशोर वाढई यांनी समस्त जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शनात म्हणाले की, माझ्या साठी आजचा दिवस खुप आनदाचा व भाग्याचा आहे. नत्थु वसाके याना भारत देशाचा तिरंगा ध्वज माझ्या ग्रामपंचायत मध्ये त्यांच्या हाताने फडकवणयिचा मान मिळाला, याचा मला अभिमान आहे.
या प्रसंगी सरपंच नंदकिशोर वाढई, ध्वजारोहणाचे मानकरी नथु वसाके, उपसरपंच कौशल्य कावळे, ग्रामपंचायत सदस्य साईनाथ पिंपळशेंडे, रंजना पिंगे, सुनीता उमाटे, पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, तंटामुक्ती अध्यक्ष निलेश वाढई, माजी तंटामुक्ती अध्यक्ष महादेव ताजने, माजी सरपंच बापुजी वाढई, माजी सरपंच नुतन आत्राम, माजी पोलीस पाटील भाऊजी वाढई, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष दत्ता पिपळशेंडे, हनुमान मंदिर अध्यक्ष प्रभाकर साळवे,
मुख्याध्यापक धानकुटे सर, ग्रामसेवक नारनवरे, प्रतिष्ठित नागरिक मारोती साळवे, देवराव वाढरे, मारुती बल्की, विठ्ठल वाढई, कवडु गौरकार, सुनील बोढाले, मंगेश ताजने, गजानन गौरकर, पुंडलिक पिंगे, शेख बाबु, मदन वाढई, राहुल साळवे, मयुर गौरकर, महादेव वाढई, रमेश आत्राम, पेदोर सर, गोखरे मडम, दुधे मडम, शिपाई सुनील मेश्राम, विशाल नागोसे व समस्त गावकरी उपस्थित होते.



