Top News

Collective Forest Rights Training Workshop at Rajura.....organized by Tata Institute of Social Sciences

राजुरा येथे सामुहिक वनहक्क प्रशिक्षण कार्यशाळा.....टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे आयोजन

 विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा 


राजुरा तालुक्यातील २१ गावांना सामुहिक वन हक्क कायदा २००६ अंतर्गत सामूहिक वनहक्क मिळाला असून मनरेगा अंतर्गत सामूहिक वनहक्क क्षेत्राचा विकास आराखडा तयार करणे,  वनहक्क प्राप्त ग्रामस्थांनी मिळालेल्या सामूहिक वनपट्ट्यांचे सीमांकन करून  घेणे, प्राप्त क्षेत्राचे संरक्षण, संवर्धन, पुनर्जीवन व व्यवस्थापन करण्याकरिता राजुरा येथील पंचायत समिती सभागृहात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

प्रशिक्षणामध्ये राजुरा तालुक्यातील २१गावातील सामुहिक वन हक्क व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले.यावेळी गटविकास अधिकारी 

हेमंत भिंगारदेवे, विस्तास अधिकारी विजय नेवारे, यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.यावेळी तालुक्यातील 

ग्रामसेवक, तलाठी, कृषीसेवक, भूमिअभिलेख, वनविभाग, लघु पाटबंधारे  विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अमोल आभारे, विनोद पेटकर, मोहसीना शेख,गणेश मुसळे, कैलाश लांडगे, स्नेहा ददगल  जिल्हा व्यवस्थापक वनहक्क, वैष्णवी चौधरकर, रजनीगंधा घुगरे, मनोज पाटील तालुका वनव्यवस्थापक, प्रवेश सुटे, जगदीश डोळसकर, नितीन ठाकरे,टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे अधिकारी अमोल कुकडे,  ज्ञानेश्वर आत्राम, एफ.ई. एसचे चंद्रपूर जिल्हा समन्वयक शुभम वानवे, प्रकाश काळे, सुषमा पोटे,सारिका नांदेवार उपस्थित होते.

सदर प्रशिक्षण कार्यशाळेला उपविभागीय अधिकारी कार्यालय राजुरा, तहसील कार्यालय, पंचायत समिती, यांचे सहकार्य लाभले.यावेळी राजुरा तालुक्यातील २१ गावातील ग्रामस्थ मोठे संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post