महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ बल्हारशाह शाखेचा उपक्रम....पत्रकार दिनी महापुरुषांना अभिवादन !
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
6 जानेवारी रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकार दिनानिमित्त राज्यभरात कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
याच अनुषंगाणे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा बल्हारशाह च्या वतीने शहरातील महापुरुषांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले यावेळी बल्हारशाह नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी जयवंत काटकर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा बल्हारशाह चे तालुकाध्यक्ष मनोहर दोतपल्ली, उपाध्यक्ष देवानंद देशभ्रतार, सचिव दिपक भगत, सहसचिव लखपति घुगलोत, कोषाध्यक्ष वसंत मून, यांच्या सह संघाचे मान्यवर सदस्य विशाल डुंबेरे, धनंजय पांढरे, गौतम कांबळे, श्रीनिवास सिंगाराव, नीलकंठ मजगवली, गणेश टोंगे, मिलींद पुणेकर यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.


