महाकाली मंदीर परीसरात नक्षलवाद्यांना अटक केल्याची माहीतीने जिल्हात खळबळ.....
नागरीकांनी घाबण्याचे कारण नाही ते नक्षलवादी नसुन पोलिसच होते.......
पोलिसांनीच पोलिसांना का पकडल...वाचा सविस्तर.......
विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर (चांदागड)
विदर्भाची आराद्य दैवत चंद्रपूरच्या माता महाकाली मंदिरात अतिरेकी शिरल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान चंद्रपूर पोलीस, अतिरेकी विरोधी दल तसेच सी 60 दलाच्या जवानांनी विद्युत वेगाने मंदिर परिसरात धाव घेतली.
सुरक्षा दलांनी तत्काळ संपुर्ण परिसर ताब्यात घेऊन संपुर्ण भागाची काटेकोरपणे तपासणी करून तीन अतिरेक्यांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून बॉम्ब हस्तगत करण्यात आला. सदर बॉम्ब त्याच परिसरात निकामी करून सुरक्षा दलाने तिनही अतिरेक्यांच्या मुसक्या आवळल्या.
अतिरेक्यांची धरपकड झाल्याचे कळताच चंद्रपूर वासियांमधे भीतीचे वातावरण निर्माण झाले व शहरात विविध अफवांचे पेव फुटले मात्र काही वेळातच ते खरे अतिरेकी नव्हते तर तो पोलीस व इतर सुरक्षा दलाची नियमित सराव होता. अशा प्रकारच्या माकमॉक ड्रिल करून सुरक्षा दलाला सज्ज ठेवल्या जाते तसेच कुठेही असा प्रसंग ओढवला तर नागरिकांना सुरक्षित ठेऊन संकटाचा सामना करण्याच्या दृष्टीने हा अभ्यास करण्यात येत असल्याचे पोलीस विभागाने कळविले असुन कुठल्याही अफवेवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.

