Top News

Santosh Thipe, Forest Range Officer of Mohurli Buffer Zone awarded the gold medal

मोहूर्ली बफर क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे सुवर्णपदकाचे मानकरी.......


राज्यशासनाच्या वन विभागा अंतर्गत कार्य करणाऱ्या वनाधिकाऱ्यांना केले जाते सन्मानित......




 विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर (चांदागड) 

 वनसंपत्तीचे संरक्षण आणि संवर्धनाचे काम प्रभावीपणे करणाऱ्या वन अधिकाऱ्यांना राज्य शासनातर्फे दरवर्षी सन्मानित केले जाते.

तर सन 2019 -20 यावर्षीच्या सुवर्णपदकाचे मानकरी मोहूर्ली बफर क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे ठरले.

 शुक्रवार दि.9/12/2022 ला राज्य शासनाच्या वतीने या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. वनविभागात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनोधर्य वाढविण्यासाठी/उंचावण्यासाठी राज्यशासनाच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी मुख्य वनसंरक्षक शिफारस करतात. 


त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांचे चारित्र्य, तांत्रिक कार्यक्षमता, गुणवत्ता आदी बघितली जाते. संतोष थिपे यांनी यापूर्वी चंद्रपूर आणि बल्हारशाह वनपरिक्षेत्रात काम केले आहे. कर्तव्यावर असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला देखील केला होता. तो त्यांनी धाडसाने परतवून लावला. तेव्हा तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पत्र पाठवून कौतुक केले होते. याशिवाय वाघाच्या हल्ल्यात मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न नेहमीच चर्चेत राहिले आहे.

 बल्लारशाह वनपरिक्षेत्रात कार्यरत असतांना जनवन विकास योजनेतंर्गत पन्नास युवकांना त्यांनी सैन्य भरतीचे प्रशिक्षण दिले. सोबतच ताडोबा मोहुर्ली वनपरिक्षेत्रातील ४० गाईडला त्यांनी इंग्रजीचे प्रशिक्षण दिले याशिवाय अनेक सामाजिक उपक्रमात ते नेहमी अग्रेसर असतात.

 शिवाय वन्यप्राण्यांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी वनपरिक्षेत्रा लगतच्या शेतकरी बांधवाना वनविभागाच्या सहकार्यातून वन्यप्राण्यांचे मुखवटे प्रदान करण्यात आले. याच त्यांच्या कार्याची दखल वनखात्याने घेतली आणि त्यांना सुवर्णपदकाचे मानकरी ठरविले.

Previous Post Next Post