Top News

A youth was killed in Rajura taluk on a pretext.

राजुरा तालुक्यात शुल्लक कारणावरून युवकाची हत्या.......


खेळू दिले नाही म्हणून धारधार शस्त्राने केली युवकाची हत्या......हत्तेने तालुक्यात खळबळ.......


 विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा 



     राजुरा तालुक्यातील बामनवाडा येथे गावातील काही युवक आपसात खेळत असतांना तेथे आलेल्या एका युवकाने मला हि खेळायचे आहे. असे म्हनटले  मात्र त्याला तेथील युवकांनी खेळू न दिल्याने झालेल्या वादात क्षुल्लक कारणावरून धारधार शस्त्राने युवकाची हत्या केल्याची धक्कादारक घटना राजुरा पासून अवघ्या ३ किलो मीटर अंतरावर असलेल्या बामणवाडा या गावात घडली. #murder

        पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीनुसार आज सकाळी ८ वाजताच्या दरम्यान महादेव कोडापे वय २२ वर्ष राहनार बामणवाडा हा गावातील काही लोकांसोबत गावात खेळत होता. #murder

तिथे आलेल्या शक्ती टेकाम वय २२ वर्ष राहनार बामणवाडा याला खेळू न दिल्याने शक्ती ने खेळत असलेल्या जागेवर पाणी टाकले यामुळे महादेव कोडापे व शक्ती टेकाम यांच्यात भांडण झालीत. #murder #rajura

 या भांडणाचा राग मनात ठेऊन शक्ती टेकाम याने स्वताच्या कमरेतून धार-धार लोखंडी सूरी काढत महादेव कोडापे याच्या पोटात खुपसली. हे पाहताच घटनास्थळी एकाच कल्लोळ उडाला. उपस्थित लोकांनी शक्तीला आवरले आणि महादेवाला तात्काळ उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे नेण्यात आले. मात्र येथील डॉक्टरांनी महादेव गंभीर अवस्थेत जखमी असल्याने त्याला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात स्थलांतरित केले, मात्र चंद्रपूर येथे पोहचताच डॉक्टरांनी महादेवला मृत घोषित केले. #murder #rajura

        क्षुल्लक कारणाने झालेल्या या घटनेने काही वेळ गावात तणाव झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा गावात पोहचला. पोलिसांनी शक्ती टेकाम याला ताब्यात घेतले असून पोलिसांनी त्याचा विरुद्ध भादंवि ३०२, शस्त्र अधिनियम कलम २५,४, १३५,३७ अन्वये गुन्हा दाखल केला असून समोरील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष दरेकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे. #murder #rajura

Previous Post Next Post