Top News

Nandkishore wadhai discussion with Meshram on issues of OBCs.

नंदकिशोर वाढई यांची ओबीसींच्या प्रश्नांवर मेश्राम यांच्याशी चर्चा. 



 विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा  



 नागपुर येथे माननीय चंद्रकांत जी मेश्राम साहेब सेवानिवृत्त न्यायाधीश प्रभारी अध्यक्ष ओबीसी राज्य आयोग महाराष्ट्र पुणे तथा सदस्य राज्य मागासवर्ग आयोग महाराष्ट्र शासन पुणे यांची नागपूर येथे भेट घेऊन ओबीसी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई यांनी त्यांचे स्वागत केले आणि ओबीसींच्या प्रश्नांवर चर्चा केली.  या प्रसंगी ओबीसीची जात निहाय्य जनगणना, ओबीसींच्या शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय आरक्षण संदर्भात चर्चा करण्यात आली. ओबोसी समाजाला अनेक अडचनीचा सामना करावा लागतो आहे. ओबीसी विद्यार्थ्याच्या स्कॉलरशिपच्या संदर्भात फार मोठी अडचण आहे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह नाहीत. ओबोसीचे राजकीय आरक्षण सुद्धा सरकारने घालवलेले आहे. याबाबत सविस्तर चर्चा केली. यावर मेश्राम यांनी ओबोसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असे आवर्जून सांगितले आहे. 

       या प्रसंगी माजी विस्तार अधिकारी कृष्णाजी भोयर, राजु पिपळशेंडे, दिलीप गिरसावळे, आकाश काळे यासह अनेक ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post