तेलंगाणा राज्याचा वेगळ्या विदर्भ राज्याला पाठिंबा......
आदिलाबाद चे आमदार जोगु रामन्ना यांनी शिष्टमंडळास घेतली ॲड. वामनराव चटप यांची भेट
बिआरएस च्या शिष्टमंडळाची ॲड. वामनराव चटप यांच्याशी चर्चा....
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
कर्नाटक सिमावादाचा प्रश्न पेटला असतांना तेलंगाना मधील भारत राष्ट्र समितीने वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागनीला पाठींबा जाहीर केला आहे. आदीलाबाद येथील आमदार जोगु रामन्ना यांनी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ॲड.वामनराव चटप यांची भेट घेतली. विदर्भ राज्यासाठीच्या आंदोलना बद्दल चर्चा करून हा निर्णय जाहीर केला.
आमदार रामन्ना म्हणाले, तेलंगाना मध्ये सरकार ने शेतकर्यांसाठी मोठ्या सुविधा निर्माण केल्या आहेत. सिंचन,वैयक्तीक लाभाच्या योजना सुरु केल्याने शेतकर्यांचे जिवनमान उंचावले. शेतमालाला योग्य भाव आणी प्रतेक शेतकर्यांना एका एकरामागे खरीपला ५ हजार आणी रब्बीला ५ हजार याप्रमाने एका एकरा साठी १०,०००रू. अनुदान दिले जाते. संजय गांधी निराधार योजना लाभार्थांना ३ हजार रूपये दिले जातात.शेतकर्यांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. २४ तास मोफत विज शेती पंपाला उपलब्द आहे. हे सर्व स्वतंत्र तेलंगणा राज्य निर्मान झाल्याने शक्य झाले आहे.
छोटे राज्य निर्मान झाल्यास सरकार व प्रशासन जनतेच्या अधिक जवळ येते आणि प्रगती होते, असे माननारी भारत राष्ट्र समिती पक्ष आहे. छोट्या राज्या निर्मीच्या बाजूने आम्ही आहोत.म्हणून स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी प्रभावी आंदोलन करणार्रा विदर्भ राज्य आंदोलन समितीला भारत राष्ट्र समिती आपला जाहीर पाठिंबा देत असल्याचेही आमदार रामन्ना यांनी सांगीतले.
या शिष्टमंडळात आ.रामन्ना यांच्या सह आदिलाबाद जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष आड्डी भोजा रेड्डी,ग्रंथालय समिती अध्यक्ष राऊत मनोहर,बिआरएस नेते देवन्ना,तेजराव मस्के,तनविर खान यांच्या सह इतर २५ नेत्यांचा समावेश होता.
२३ डिसेंबर ला आदिलाबाद व कागजनगर शिरपुरच्या भारत राष्ट्र समितीच्या आमदारांनी व नेत्यांनी विदर्भ राज्य आंदोलन समिती चे अध्यक्ष ॲड.वामनराव चटप यांची भेट घेऊन चर्चा केली होती, यावेळी ॲड.चटप यांच्या सह राजुरा बाजार समिती चे माजी सभापती प्रभाकर ढवस,अनंताआ गोडे,विराआंस युवा आघाडी पुर्व विदर्भ अध्यक्ष कपील इद्दे,मधुकर चिंचोलकर पुंडलीक वाढई उपस्थीत होते.

