Top News

Gadchiroli police force arrested a Jahal Nakshvadist with a reward of Rs 2 lakh.....

2 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या एका जहाल नक्षलवाद्यास गडचिरोली पोलीस दलाने केली अटक.....



विदर्भ माझा न्युज 24 - गडचिरोली 


 गडचीरोली जिल्हातील उपविभाग भामरागड मधील पोमकें धोडराज हद्दीतील दिनांक 25/12/2022 रोजी मौजा नेलगुंडा या गावात जहाल नक्षलवादी नामे वत्ते ऊर्फ प्रदीप वंजा वड्डे, वय 40 वर्षे, रा. नेलगुंडा ता. भामरागड जि. गडचिरोली हा त्याच्या स्वत:च्या गावात लपून बसलेला असल्याच्या गोपनिय माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस दलाच्या विशेष अभियान पथकाचे जवान अभियान करीत असतांना त्याला ताब्यात घेतले.

  गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवादी नेहमीच शासकिय मालमत्तेचे नुकसान करीत असतात तसेच पोलीस दलाचे नुकसान अथवा घातपात करण्याच्या उद्देशाने योजना आखत असतात.  मिळालेल्या माहितीवरुन हा जहाल नक्षलवादी काही विघातक कृत्य करण्याच्या उद्देशाने गावामध्ये लपून बसलेला होता.  त्याच्या विघातक कृत्यांना वेळीच आळा घालण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश मिळाले आहे. 



 अटक करण्यात आलेला नक्षलवादी  वत्ते ऊर्फ प्रदीप वंजा वड्डे, वय 40 वर्षे, रा. नेलगुंडा, तह. भामरागड, जि. गडचिरोली येथील असुन, 1997 साली तो नक्षलमध्ये भरती होवुन, सध्या भामरागड दलममध्ये सदस्य या पदावर कार्यरत होता. त्याच्यावर 03 पोलीस खुनासहीत 8 खुन, 3 चकमक, 1 दरोडा व इतर 1 असे एकुण 13 गुन्हे दाखल आहेत.  अशा अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असून, सदर नक्षलवाद्यास गडचिरोली पोलीस दलाने अटक केलेली असून, पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे. 

 त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने 02 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.  गडचिरोली पोलीस दलाने राबविलेल्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे माहे- जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 60 नक्षलवाद्यांना अटक, 08 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण व 03 नक्षलवाद्यांचा पोलीस-नक्षल चकमकीमध्ये मृत्यु झाला आहे.

 सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक  नीलोत्पल, अभियानाचे अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे ,प्रशासनाचे अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता,  अपर पोलीस अधीक्षक अहेरी. यतिश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असुन नक्षलवाद्यांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Previous Post Next Post