Top News

Police arrested a gang of children traffickers at Balharshah railway station.

बल्हारशाह रेल्वे स्टेशन वर लहान मुलांची तस्करी कराणार्या टोळीला पोलिसांनी केली अटक.......



विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह 



लहान मुलांची तस्करी करणाऱ्या टोळीला बल्लारशाह व नागपूरच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या विषेश पथकाने अटक केली आहे.

सवीस्तर वृत्त असे आहे की दिनांक 25 डिसेंबर 2022 ला रेल्वे मदत कक्षाला एका भ्रमणध्वनी व्दारे तक्रार केली गेली तक्रारदारा कडुम मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे गाडी क्रमांक १२६५५ नवजीवन एक्स कोच/६ मध्ये, २५ डिसेंबर ला एक जोडपं एका नवजात बाळाला घेऊन प्रवास करीत असल्याची माहिती या चमूला प्राप्त झाली. बाळ हा केवळ २ महिन्याचा असून, वारंवार रडत असल्याची माहिती रेल्वे मदत कक्षाला मीळताच सदर माहीती चंद्रपूर पोलिस स्टेशनला देण्यात आली.

माहिती मिळताच नागपूर च्या गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक उपनिरीक्षक मुकेश राठोड, चंद्रपूर पोस्टचे ह्युमन ट्रॅफिकिंग टीमचे सदस्य निरीक्षक एन. राय, उप निरीक्षक प्रवीण महाजन, संजय शर्मा, व आर. एल. सिंह यांनी चंद्रपूर स्थानकांवर चौकशी केली. 

परंतु, एस/६ कोच मध्ये जोडपे नसल्याने त्यांनी ट्रेन मध्ये चौकशी सुरु ठेवली. दरम्यान चौकशी करीत असतांना, कोच एस ३ मध्ये नवजात बाळासोबत प्रवास करीत असलेल्या जोडप्यांवर चमूला संशय आला. संशय असतांना जोडप्याला बल्लारशाह स्थानकावर उतरविण्यात आले.

सदर जोडप्याला पोस्ट वर नेण्यात आले चौकशी केल्यावर बल्लारशाहचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण यांनी चाईल्ड लाईनशी संपर्क साधून बाळाला त्यांच्या स्वाधीन सोपविले. त्यानंतर चंद्रपूर चाईल्ड लाईनच्या पंचांसमोर चौकशी सुरू असताना जोडप्याने अहमदाबाद वरून विजयवाडा पर्यंत बाळाला घेऊन जात असल्याची कबुली दिली. त्यासाठी पुरुषाला १०,००० व महिलेला ५००० रुपये देण्यात आले होते. ते दोघे पती पत्नी नसून, लहान मुलांची तस्करी करण्याचा गुन्हा त्यांनी पोलिसांसमोर स्वीकारला.

ही संपूर्ण बाब पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी आरोपी पुरुषाचा मोबाइल तपासाला त्यामध्ये विजयवाडा येथील, अन्य २ - ३ अनोळखी लोकांसोबत मुलांबाबत चॅट्स, व्हिडिओ , आणि देवाणघेवाणीच्या गोष्टी पोलिसांच्या समोर आल्या.

सदर आरोपींचे नाव  -चंद्रकांत मोहन पटेल, वय- 40, वर्ष पता- इंदिरानगर संगम सोसायटी राणी सती मार्ग मलाड ईस्ट मुंबई तर महिला ने आपले नाव  द्रौपदी राजा मेश्राम, वय- 40 वर्ष, पत्ता-IBM रोड, धम्म नगर गिट्टी खदान, काटोल रोड नागपूर असुन सदर कार्यवाही  एस आर डीएससी/एनजीपी महोदय तथा एएससी/एनजीपी यांच्या कुशल मार्गदर्शन व  निर्देशना नुसर करण्यात आली.

Previous Post Next Post